पुण्यातील दिराचं भयंकर कृत्य; वहिनीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी अन्..; कारण धक्कादायक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका ५८ वर्षीय व्यक्तीने आपल्याच वहिनीला बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावर चक्क उकळते पाणी ओतले.
पुणे : नात्यातील संवाद संपला की रागाचा पारा किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय मुळशी तालुक्यातील भुकुम येथे आला आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका ५८ वर्षीय व्यक्तीने आपल्याच वहिनीला बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावर चक्क उकळते पाणी ओतले. या भीषण हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, आरोपी दिराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच दिवसांपूर्वीच्या वादाचा सूड
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा शरद पवार (वय ४५, रा. भुकुम) या बुधवारी आपल्या घरासमोर नेहमीप्रमाणे भांडी घासत होत्या. त्यावेळी त्यांचा दीर भरत निवृत्ती पवार (वय ५८) तिथे आला. प्रतिभा आणि भरत यांच्यात पाच दिवसांपूर्वी काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग भरतच्या मनात होता. सूड घेण्याच्या उद्देशानेच तो तिथे पोहोचला.
advertisement
गरम पाण्याची बादली ओतून केला हल्ला
भरतने प्रतिभा यांना पाहताच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत असतानाच भरतने क्रूरतेची सीमा ओलांडली. त्याने आपल्या हातातील गरम पाण्याची बादली थेट प्रतिभा यांच्या अंगावर ओतली. उकळत्या पाण्यामुळे प्रतिभा यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून त्या वेदनेनं विव्हळत होत्या. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
advertisement
पोलीस कारवाई
याप्रकरणी प्रतिभा पवार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी भरत पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. घरगुती वादातून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे भुकुम परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 9:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील दिराचं भयंकर कृत्य; वहिनीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी अन्..; कारण धक्कादायक









