TRENDING:

Sharad Pawar: मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन पण थेट नकार, शरद पवारांनी सगळचं सांगितलं

Last Updated:

आमची मत कमी आहेत तरी आम्हाला चिंता नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. पण आम्ही नसले उद्योग करणार नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीसांनी उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केल्याचं शरद पवारांनी सांगितंले. तसेच निवडणूक आयोगाकडून आम्हाला फार काही अपेक्षा नसल्याचं पवारांनी म्हटले आहे.
News18
News18
advertisement

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज मतचोरीबाबत पराभूत उमेदवारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत काही धक्कादायक माहितीसपुढे आली . त्यानंतर तातडीची पत्रकार परिषद घेतली त्यावेळी शरद पवार म्हणाले. उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन केला. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत दोघांना विनंती केली अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन करुन राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याची विनंती केल्याचं पवारांनी सांगितंल तर राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाहीत पाठिंबा शक्य नसल्याचं फडणवीसांना सांगितलं आहे. आम्ही बी सुदर्शन यांचा उपराष्ट्रपती पदासाठी फॉर्म भरलाय. आमची मत कमी आहेत तरी आम्हाला चिंता नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. पण आम्ही नसले उद्योग करणार नाही.

advertisement

निवडणूक आयोगाकडून आम्हाला फारकाही अपेक्षा नाही: शरद पवार

निवडणूक आयोग हे स्वतंत्र आहे पण त्यांनी त्यांचे काम केले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. निवडणूक आयोगाकडून आम्हाला फारकाही अपेक्षा नाहीत निवडणूक याद्यांबाबत आमचा अभ्यास सुरु असल्याचीही माहिती शरद पवारांनी दिली आहे.

15 दिवसात आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या चोऱ्या बाहेर काढणार : जितेंद्र आव्हाड

advertisement

जितेंद्र आव्हाड म्हणाले, येत्या 15 दिवसात आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या चोऱ्या बाहेर काढणार आहोत. संगणकात नावे फिड करताना कॉमा, डॅाट, शून्य, डबल शून्य, शून्य शून्य शून्य असे आहेत काही तरी फिड करावे लागतेच त्यातून ते केले गेले. 17 ए ची माहिती मागितली तर कायदा करून टाकला आणि माहिती लपवली गेली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar: मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन पण थेट नकार, शरद पवारांनी सगळचं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल