160 जागा जिंकून देण्याची ऑफर
विधानसभा निवडणुकीमध्ये 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर घेऊन दोघाजणांनी आपली भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी केला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी ही लोकं आली होती. पण आता माझ्याकडं त्यांची नावं आणि पत्ते नाहीत, असं शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाच्या संस्थेबद्दल मला शंका नव्हती. असे लोक भेटत असतात पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, असंही ते म्हणाले.
advertisement
राहुल गांधींशी गाठ घालून दिली
मात्र, त्यावेळी मी त्यांची गाठ राहुल गांधी यांच्याशी घालून दिली. त्या लोकांना जे जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं. परंतू अशा प्रकारात आपण पडायला नको, असं आमचं आणि राहुल गांधींचं ठरलं, असा खुलासा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. हा आपला रस्ता नाही, लोकांचा निर्णय असेल तो आपण स्विकारू असं आमचं ठरलं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर देखील भाष्य केलं. राज ठाकरे भूमिका घेतात दोन भाऊ काय निर्णय घेतात. दोन्ही भावांना एकत्र येऊन द्या अनेकांच्या पोटात वेदना होत आहे ते होऊ द्या. अनेकांची झोप उडाली ते एकत्र आले, तर आम्हाला आनंद आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ अगोदर त्यांना एकत्र येऊ द्या, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.