TRENDING:

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे महत्त्वाची मागणी, नेमके काय म्हणाले?

Last Updated:

Sharad Pawar Write Letter To Railway Minister: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये खासदार शरद पवार यांनी कोकणवासीयांसाठी एक विशेष मागणी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये खासदार शरद पवार यांनी कोकणवासीयांसाठी एक विशेष मागणी केली आहे. कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकांवर काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. कोकण रेल्वे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. गणेशोत्सव आणि शिमगा या सणांमध्ये कोकणवासीय रेल्वेमधून मोठ्या प्रमाणावर प्रवास करताना दिसतात.
News18
News18
advertisement

निसर्गरम्य वातावरण, समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी कोकण प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये पर्यटक या गोष्टी पाहण्यासाठीच जात असतात. कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला नेते शरद पवार यांनी खास पत्र लिहून कोकणातील काही रेल्वे स्थानकांवर लांब पल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्या, असं म्हणाले आहेत. आपल्या पत्रात नेते शरद पवार यांनी लिहिले की, "सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असून, आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनार्‍यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी वारशासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवरे बाजारमधील फोटो ठरला भारी, बैजू यांना वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर
सर्व पहा

"त्यामुळे निवडक एक्सप्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत असे ते या पत्रात म्हणाले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात व प्रमुख सणांच्या काळात जसे की गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी दरम्यान याची अंमलबजावणी करा. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांच्या प्रवासात सोय होईल. स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. तसेच सामान्य जनतेच्या मागणीला योग्य न्याय मिळेल." असे ते म्हणाले आहेत. तब्बल ३२ एक्सप्रेसचा खा.‌ शरद पवार यांनी उल्लेख केला असून या यादीतील निवडक एक्सप्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी स्थानकांवर थांबे देण्यात यावे असे ते म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे महत्त्वाची मागणी, नेमके काय म्हणाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल