ठाणे महानगरपालिकेत खूप मोठा भ्रष्टाचार झालाय. अधिकारी कोणाच्या इशाऱ्याने काम करतायेत. अधिकाऱ्यांना कोणाचीच भीती नाही. कारण त्यांना एक विशिष्ट शक्ती पाठबळ देत आहे. २०१७ साली निवडणूक झाली. गेली साडे तीन वर्षे ठाणे मनपावर प्रशासक काम पाहत आहेत. अशातच ठाण्यातील रस्ते, मुलभूत सुविधा यांचा बोजवारा उडाला असून त्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्रित येऊन मोर्चातून आवाज उठवणार आहेत.
advertisement
ठाणे महानगरपालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे आणि अपूर्ण कामामुळे ठाण्यातील जनता त्रस्त आहेत, असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले. विरोधी पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. ठाणे मनपाचा कारभार कसा सुरू आहे, पालिकेची तिजोरी कशी लुटून खाल्ली जातीये, अशा सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत. मोर्चातून हेच विषय जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करू. मोर्चात महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष सहभागी होणार आहेत, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
अविनाश जाधव काय म्हणाले?
ठाणे शहरातील समस्यांच्या बाबतीत शिवसेना आणि मनसे एकत्रित येऊन मोर्चा काढण्यात येत आहे. भ्रष्टाचारात ठाण्याचा नंबर लागतो. ठाणे ही भ्रष्टाचाराची राजधानी आहे. शहरातील घोडबंदर रस्ता आणि वाहतूक कोंडी याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अडीच वर्षे भोगले आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी होणार आहेत. तसेच काँग्रेस बरोबर येण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, असे अविनाश जाधव म्हणाले.