>> उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :
- तुमच्या मनामध्ये राग आहे गेले अडीच वर्षे हा राग हृदयात ठेवलाय
- अजूनही आपणाला न्याय मिळालेला नाही. न्यायदेवताच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे पण न्याय नाही
- मी सुद्धा त्यांच्या सोबत जाऊ शकलो असतो. त्यांना पन्नास खोके दिले मी गेलो असतो तर गोदाम भरले असते. गद्दारी माझ्या रक्तात नाही
advertisement
- धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे
- शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ मोदींच्या हस्ते अनावरण करण्यासाठी घाई-घाईने उभा केला. आठ महिन्यात पुतळा कोसळून पडतो. जाऊ तिथे खाऊ असं सरकारचं सुरू आहे.
- हे सरकार टक्केवारीचे आहे,खोके सरकार आहे
- निवडणूक जवळ आल्यावर बहीण दिसली
- बदलापूर मध्ये अत्याचार झाला तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. कोणत्या तोंडाने तिच्या आईला लाडकी बहिणीचा लाभ देणार
- योजनेच्या समोर महागाई वाढते ती लोकांच्या आवाक्यात नाही.
- ठेकेदारांचे पैसे खायचे,राज्य विकायचे,पुतळा उभारताना पैसे खायचे
- कोश्यारीने शिवाजी महाराजांचा अपमान केला. भाजपने निषेध नाही केला. दाढी खांजळून निषेध नाही केला. आम्ही मोर्चा काढला
- जय शिवाजी जय भवानी मशाल गीतातले शब्द काढायला आम्हाला सांगत आहेत. तसे न केल्यास कारवाईची भिती घालत आहेत.
- मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे वाढवले नव्हते.
- आमचे सरकार आले तर जीवनावश्यक वस्तुंचें भाव स्थिर ठेवणार
- सरकार पण स्थिर भाव पण स्थिर
- मराठी आणि गुजरात असा वाद कधी होऊ देणार नाही
- आमच्या राज्याचा घास लुबाडणार असाल तर ते होऊ देणार नाही
- अडीच वर्षात माझे काय चुकले सांगा
- शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत, शिवभोजन थाळी, नंबर वन राज्य बनवले होते की नाही
- आमचे काय चुकले होते का सरकार आमचे पाडले
- महाराष्ट्र मधला एक सुद्धा उद्योग बाहेर जाऊ देत नव्हतो. एवढा दरारा आमचा होता म्हणून सरकार पाडले.
- ही गद्दारी केवळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी नाही महाराष्ट्रसोबत केली
- महाराष्ट्र त्यांना गुजरातला विकायचा आहे म्हणून त्यांना बसवले
- मुलींच्या प्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार. मुली-मुले आमचे आधारस्तंभ आहे
- महिला पोलिसांची भरती करणार
- स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभी करणार
- आपले सरकार मुंबईत परवडेल अशी घरे देणार
- शेतकऱ्याना हमीभाव देणार
- गद्दारी करून सरकार पाडले नसते तर पुन्हा कर्ज मुक्त केले असते
- बटेंगे तो कंटेंगे म्हणतात आम्ही तुटू देणार नाही, आम्ही लुटू देणार नाही
- मशाल पेटणार खोकेवाले भस्म होणार
