आश्रमाचे महत्त्वपूर्ण प्रयोग
गोपुरी आश्रमातून आप्पासाहेबांनी विविध नवनवीन प्रयोग केले. कोकणातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाचा विकास करण्यासाठी त्यांनी गोपुरीत पहिली गोशाळा सुरू केली. कोकणाच्या विकासासाठी फळबाग लागवड केली आणि मसाल्याच्या पिकांची लागवड आंतरपिक म्हणून सुरू केली. तसेच अन्नधान्य व भाजीपाला उत्पादनासाठी आधुनिक पद्धती कशा वापरता येतील, यावर त्यांनी प्रयोग केले.
advertisement
पावसाळ्यात ग्रामीण भागात पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी त्यांनी शौचालयाच्या विविध मॉडेल्स तयार केल्या आणि स्वस्तात शौचालये उभारून स्वच्छतेचा प्रसार केला. यामुळे आजारांचे प्रमाण कमी झाले.
गोबर गॅस प्लांटचे यशस्वी मॉडेल
कणकवलीतील गोपुरी आश्रमात त्यांनी पहिला गोबर गॅस प्लांट बांधला. हा प्लांट यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्र आणि भारत सरकारने त्याचा प्रसार केला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांना इंधनाचा स्वस्त व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला.
आप्पासाहेब पटवर्धन यांचे योगदान आजही ग्रामीण विकासासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.





