बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून हत्या केल्याप्रकरणी भाजप उमेदवार शालन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. शालन शिंदे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलिसांकडून भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीत कुठेही चटणीचा पुरावा न आढळल्याने शालन शिंदे यांना वाढीव पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली नाही, अशी माहिती वकिलांची दिली.
advertisement
आरोपी शालन शिंदे यांच्या वकिलांचा एक युक्तिवाद, न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली
मनसेचे विद्यार्थी सेनेचे नेते सरवदे यांच्या हत्या प्रकरणात शालन शिंदे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. तसेच आतापर्यंत केलेला तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर ठेवला. घटनेच्या वेळी शालन शिंदे यांनी यांनी चटणीचा वापर केला आहे, त्याबाबत तपास करणे आहे, असे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र आम्ही न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून दिले की, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून जे जे नमुने गोळा केले, त्या नमुन्यांमध्ये चटणीचा समावेश नाही. जप्त केलेल्या गोष्टींमध्येही चटणीचा समावेश नाहीये. त्यामुळे शालन शिंदे यांनी चटणीचा वापर केला असे म्हणता येणार नाही. एकंदर सरकारी पक्षाची मागणी विचारात घेऊ नये, असा युक्तिवाद आरोपीचे वकील संतोष नाव्हकर यांनी केला. न्यायालयाने देखील हीच बाब लक्षात घेता आरोपीला वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यास नकार दिला.
