हन्नूर गावात कुटुंबावर काळाने घाला घातला, अपघातात एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाला, नातवाचा मृत्यू झाल्याने आजीला मोठा धक्का बसला. हा धक्का पचवू शकली नाही. नातवाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना ती धायमोकलून रडली आणि अखेर तिनेही स्मशानभूमीतच आपले प्राण सोडले. आजी नातवातलं हे नातं आणि या घटनेमुळे गावात शोककळा पसरली, संपूर्ण गाव हळहळलं.
advertisement
हन्नूर गावातील आदित्य व्हनमाने या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो एका खासगी दुचाकीस्वारासोबत गावाकडे येत होता. रस्त्यात दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले. पेट्रोल भरून रस्त्यावर येत असताना एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चालक जखमी झाला, तर आदित्यचा जागीच मृत्यू झाला.
VIDEO: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ गेला अन् गळ्यात घातला हात, नाशिक हादरलं!
या अपघाताची बातमी हन्नूर गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी गावातल्या स्मशानभूमीत तयारी सुरू होती. त्यावेळी आदित्यची आजी, जनाबाई व्हनमाने, यांनी आपल्या लाडक्या नातवाचा मृतदेह पाहिला. आपल्या एकुलत्या एक नातवाचे असे अचानक निघून जाणे त्यांना सहन झाले नाही. याच धक्क्याने त्यांना जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी स्मशानभूमीतच प्राण सोडले. आजी आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. या घटनेमुळे गावात शोकाकूल वातावरण आहे.