TRENDING:

सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का; पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, करमाळ्यात कमळ कोमेजलं

Last Updated:

सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार भाजपला सोलापूरच्या पाच नगरपरिषदांमध्ये मोठा धक्का बसला असून पाच ठिकाणी भाजप पिछाडीवर आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 11 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक होतेय. यामध्ये जिल्ह्यातील सर्व 12 ठिकाणी भाजप चिन्हावर निवडणूक लढत असून त्यांच्याविरोधात इतर पक्ष अशीच ही लढत असणार आहे. मात्र सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार भाजपला सोलापूरच्या पाच नगरपरिषदांमध्ये मोठा धक्का बसला असून पाच ठिकाणी भाजप पिछाडीवर आहेत. पंढरपूर, मंगळवेढा , अकलूज, कुर्डुवाडी, करमाळा येथे भाजप पिछाडीवर आहे. भाजपने येथे सर्वस्व पणाला लावले होते.पंढरपूर संभाव्य कॉरिडॉरचा भाजपला झटका बसला आहे.
News18
News18
advertisement

पंढरपूर नगरपरिषद  

पंढरपुरात भाजपला रोखण्यासाठी इतर पक्षांनी स्थानिक आघाडी केली आहे. पंढरपूर नगर परिषदेत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, अजितदादा गट, काँग्रेस यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांचे विठ्ठल परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. भाजपतर्फे श्यामल शिरसठ, तीर्थक्षेत्र आघाडी तर्फे प्रणिता भालके तर विठ्ठल परिवर्तन आघाडी तर्फे सारिका साबळे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणार आहेत.

advertisement

मंगळवेढा नगरपरिषद 

मंगळवेढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होत आहे. यामध्ये शरद पवार गटाला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची साथ असणार आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी सुप्रिया जगताप तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुनंदा अवताडे यांच्यात लढत होणार आहे

अकलूज नगरपरिषद 

अकलूज मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गट अशी तिरंगी लढत आहे.माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात भाजप+शिवसेना शिंदे सेनेकडून पूजा कोथमीरे तर मोहिते पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रेश्मा आडगळे तसेच धवलसिंह मोहिते पाटलाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून देवयानी रास्ते यांच्यात मुख्य लढत असणार आहे.

advertisement

करमाळा नगरपरिषद 

करमाळा नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप + राष्ट्रवादी अजितदादा गट विरुद्ध सचिन सावंत यांच्या नेतृत्वात स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत असणार आहे. भाजपकडून सुनीता देवी तर शिवसेना शिंदे गटाकडून नंदिनी जगताप तसेच शहर विकास आघाडीकडून मोहिनी सावंत यांच्यात मुख्य लढत असणार आहे.

कुर्डुवाडी नगरपरिषद 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

कुर्डूवाडी नगर परिषदेत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गट + आठवले गट विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट + शिवसेना शिंदे गट अशी चौरंगी लढत होणार आहे. कुर्डूवाडीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जयश्री भिसे, भाजपकडून माधवी गोरे, काँग्रेस कडून मनीषा गवळी तर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून सुरेखा गोरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून समिरून्नीसा मुलाणी यांच्यात मुख्य लढत असणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का; पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, करमाळ्यात कमळ कोमेजलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल