सतीश सुनील शिंदे वय 36 असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.सोलापूर शहर आपत्ती व्यवस्थापकांकडून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्याचे काम सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. इतकंच नाही तर प्रणिती शिंदे यांनी देखील सकाळी सकाळी अधिकाऱ्यांना फोन लावून जाब विचारला आहे.
घडलेल्या घटनेनंतर प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी तातडीनं अधिकाऱ्यांना फोन लावून जाब विचारला. अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. रस्त्यावर कामं सुरू असताना बॅरिकेटिंग का करण्यात आलं नाही असा जाब प्रणिती शिंदे यांनी विचारला.
advertisement
इथे जे ब्रिजचं काम सुरू आहे तिथे एक रिक्षा चालक वाहून गेला काल संध्याकाळी जो अद्याप मिळाला नाही. इथे बॅरिकेटिंग लावायला पाहिजे ते झालं नाही. त्यामुळे रिक्षा चालक अचानक नाल्यात गेला. याला जबाबदार कोण आहे? का बॅरिकेटिंग लावले नाहीत असा सवाल करत प्रणित शिंदे यांनी अधिकाऱ्यांना झापलं.
संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मराठवाडा विदर्भातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पुणे उपनगरात मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली. मुंबईतही पावसामुळे हाल सुरू आहेत. सखल भागांत पाणी साचलं आहे. लोकल वाहतूक 20 मिनिटं उशिराने तर रस्ते वाहतूकही धीम्या गतीनं सुरू आहे.