TRENDING:

BREAKING: सोलापूरात अग्नीतांडव, टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू

Last Updated:

Massive Fire in Solapur MIDC: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात एका टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात एका टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत एकूण चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप आगीत पाच ते सहा जण अडकले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात सेंट्रल इंडस्ट्री नावाचा टॉवेल निर्मिती कारखाना आहे. या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची घटना समोर आल्यानंतर तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. पहाटे तीन वाजल्यापासून घटनास्थळी तब्बल १० अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.

advertisement

अग्निशमन दलाने आतापर्यंत आगीतून चार गंभीर अवस्थेत बाहेर काढलं आहे. या चारही जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कारखान्यातून धुराचे लोट सर्वदूर पसरले आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अग्निशमन दलाची 10 वाहने आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहाटे तीन ते पावणेचारच्या दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे.

advertisement

दरम्यान, सोलापूर महापालिकेचे चीफ फायर ऑफिसर राकेश साळुंखे आणि अन्य एक फायर कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवताना अंशतः भाजल्याची माहिती देखील समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न कार्यरत आहे. आगीचे कारण अजून पर्यंत समजले नाही. आग विझवण्याचं काम सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BREAKING: सोलापूरात अग्नीतांडव, टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल