TRENDING:

आस्मानी संकट आलं अन् होत्याचं नव्हतं झालं! काही मिनिटांत शेतकऱ्याचं 12 लाखांचं नुकसान!

Last Updated:

Banana Farm: सोलापूर जिल्ह्याला आस्मानी संकटानं झोडपलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पापरीतील शेतकरी दत्तात्रय कदम याची दीड एकर केळीची बाग भूईसपाट झालीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर – गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी संकट घोंघावतंय. सोलापूर जिल्ह्यात देखील वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मोहोळ तालुक्यातील पापरी येथे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटानं हिरावून घेतलाय. शेतकरी दत्तात्रय कमद यांची दीड एकर केळीची बाग आडवी झालीये. यामध्ये 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालंय.

advertisement

केळीची बाग भूईसपाट

शेतकरी दत्तात्रय विठोबा कदम यांची पापरी येथे दीड एकरात केळीची शेती आहे. दत्तात्रय कदम यांनी एक केळीचे रोप 25 रुपये प्रमाणे 2200 रोपांची दीड एकरात लागवड केली. लागवड, औषध फवारणी असा सगळा खर्च मिळून त्यांना 55 हजार रुपयांचा खर्च आला होता. तर दहा महिन्यात केळीचे व्यवस्थापन करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च झाले. जवळपास दोन ते अडीच लाख खर्चून जपलेली बाग अचानक आलेल्या वादळात आडवी झाली.

advertisement

View More

उन्हाळ्यातलं पैशाचं पिक, पण यंदा काय झालं? खर्चही निघेना, शेतकऱ्याला रडवलं! Video

10 ते 12 लाखांचं नुकसान

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी कसरत करून केळीची बाग जोपासली. परंतु, काही मिनिटांत आलेल्या वादळानं हातातोंडाशी आलेला घास ओढून नेला. दीड एकर केळीची बाग भूईसपाट झाली. केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यने कदम यांचे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घातलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत असून कदम यांनी मदतीची मागणी केली आहे.

advertisement

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पापरी येथे वादळी पावसानं मोठं नुकसान झालंय. केळीसह विविध शेती पिके आडवी झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच काही ठिकाणी मोठी झाडे आणि विजेचे खांब देखील पडले आहेत. याप्रकरणी लवकरात लवकर पंचनामे करून सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आस्मानी संकट आलं अन् होत्याचं नव्हतं झालं! काही मिनिटांत शेतकऱ्याचं 12 लाखांचं नुकसान!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल