बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाची मान्यता
माजी आमदार राजन पाटील यांनी बिनविरोध झालेल्या प्राजक्ता पाटील यांचं नगराध्यक्ष पदाचं प्रमाणपत्र घेतलं. सुनबाई बंगळुरूला गेल्या असल्याने आपण प्रमाणपत्र स्वीकारल्याचं राजन पाटील यांनी सांगितलं. अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाने मान्यता देण्यात आली आहे.
advertisement
नेमका राडा काय झाला होता?
गेल्या 50 वर्षांपासून म्हणजेच, जेव्हापासून अनगर ग्रामपंचायत होती, तेव्हापासून या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होत होती. त्यामुळे अनगर नगरपंचायतीची ही पहिली निवडणूक असली तरी ही निवडणूक सुद्धा बिनविरोध व्हावी, असं माजी आमदार राजन पाटील यांचे म्हणणं होतं. मात्र, सुरूवातीपासून या नगरपंचायतीची निवडणूक गाजली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे पाटील यांना एबी फॉर्म मिळाला होता. ज्यामुळे राजन पाटील यांनी उज्ज्वला थिटेंच्या मार्गात अडथळे आणत त्यांना दोन दिवस हा फॉर्म भरण्यापासून रोखले. पण पोलिसांच्या बंदोबस्तात १७ नोव्हेंबरला पहाटे पाच वाजता थिटे यांनी आपल्याला मुलाला सोबत घेत नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला.
