सोलापूर : भारतात अनेक नद्या आहेत. प्रत्येक नदीचे आपले एक विशेष असे महत्त्व आहे. आज आपण भीमा-सीना नदीचा संगम ज्याठिकाणी होतो, त्या जागेचे महत्त्व नेमके काय आहे, हे जाणून घेणार आहोत. हत्तरसंग-कुडलसंगम असे या ठिकाणाचे नाव आहे.
हत्तरसंग कुडलसंगम हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेले स्थळ आहे. कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम असा आहे. येथे भीमा व सीना या दोन नद्यांचा संगम असून आहे. तेथे अत्यंत जुनी हेमाडपंती संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिरे आहेत. याबाबत अधिक माहिती मल्लिकार्जुन यमदे यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement
हत्तरसंग-कुडलसंगम येथे भीमा आणि सीना या दोन नद्यांचा संगम आहे. हिंदू धर्मातील रितीरिवाजानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी दहावे, तेरावे, मासिक तसेच वार्षिक श्राद्धप्रसंगी पिंडदान केले जाते. हा पिंडदानाचा विधी पवित्र नदीच्या संगमस्थळावर करण्यास विशेष महत्त्व आहे.यामुळे याठिकाणी महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील आसपासच्या जिल्ह्यातील नागरिक याठिकाणी धार्मिक विधीसाठी मोठी गर्दी करतात.
जीवनशैलीत करा फक्त हे 5 बदल अन् लठ्ठपणाला करा बाय बाय, महत्त्वाची माहिती..
याशिवाय जन्मपत्रिकेतील विविध दोष, विविध गृहांच्या शांती आणि इतर अनेक दोष निवारण करण्यासाठी येथे अनेक प्रकारचे विधी केले जातात. उत्तरेकडून येणारी भीमा नदी आणि पश्चिमेकडून येणारी सीना नदी यांचा संगम इंग्रजी T अक्षरासारखा आहे. भारतात सहसा इंग्रजी अक्षर Y प्रमाणे दोन नद्यांचा संगम दिसतो. त्यामुळे हत्तरसंग कुडल येथील भीमा-सीना नद्यांचा संगम दुर्मिळ आणि अद्वितीय आहे.
बटाट्याचा पराठा हा मनु भाकरचा आवडीचा पदार्थ, सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO
या विधीसाठी या ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच दोन नद्यांचा संगम पाहण्यासाठी मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, तसेच कर्नाटक राज्यातून देखील या ठिकाणी पर्यटक येतात. तसेच पर्यटकांसाठी विश्रांती गृहाची सोय केलेली आहे. नदीमध्ये बोटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.