व्यवसाय अन् घरासाठी 10 लाखांचा तगादा, विवाहितेला मारहाण करून माहेरी पाठवले, सोलापुरातील धक्कादायक घटना
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
लग्नात मानपान न झाल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी त्यांना सतत शिवीगाळ केली आणि मारहाण केली. व्यवसाय आणि घरासाठी माहेरातून दहा लाख रुपये आणण्याचा आग्रह धरला.
सोलापूर : व्यवसाय आणि घर घेण्यासाठी माहेरातून पैसे घेऊन येण्यास तगादा लावणाऱ्या पतीसह सासू-सासरे, नणंदांसह सात जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 नोव्हेंबर 2020 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घडली. या संदर्भात 30 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी कौसर वसीम शेख (वय 32, रा. रामवाडी, सोलापूर) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली आहे. कौसर यांचा विवाह 22 नोव्हेंबर 2020 रोजी वसीम जब्बार शेख यांच्याशी झाला. लग्नात मानपान न झाल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी त्यांना सतत शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
advertisement
व्यवसाय आणि घरासाठी माहेरातून दहा लाख रुपये आणण्याचा आग्रह धरला. शारीरिक-मानसिक त्रास दिला तसेच पतीचे दुसरे लग्न करण्याची धमकी दिली. लग्नात कौसर यांच्या आई-वडिलांनी दिलेले दहा तोळे सोन्यापैकी अडीच तोळे सोने परत न देता व्यवसायात वापरले आणि मारहाण करून माहेरी पाठवले.
या प्रकरणात फिर्यादी कौसर वसीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती वसीम जब्बार शेख, सासरे जब्बार शेख, सासू आशाबी शेख, यास्मिन शेख, रेश्मा खान, जरीना शेख, समीर शेख यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल राजगुरू हे करीत आहेत. या घटनेमुळे कौटुंबिक हिंसेप्रती समाजातून संताप व्यक्त होत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 4:44 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
व्यवसाय अन् घरासाठी 10 लाखांचा तगादा, विवाहितेला मारहाण करून माहेरी पाठवले, सोलापुरातील धक्कादायक घटना









