सोलापूर : आषाढी एकादशी हा संपूर्ण वारकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी मोठा दिवस असतो. आज याच आषाढी एकादशी निमित्त सोलापुरातील चित्रकार विपुल मिरजकरने यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चक्क लोखंडी खिळ्यांच्या साहाय्याने विठुरायाची मूर्ती साकारली आहे.
3000 मीटर दोरा आणि 300 खिळे वापरून विठुरायाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही कलाकृती साकार करण्यासाठी विपुल मिरजकर यांना 2 दिवसांचा कालावधी लागला. पंढरपूरच्या वारीत वारकरी जसे रिंगण सोहळा साजरा करतात, त्याचप्रमाणे विपुलने लाकडाची रिंग तयार करून ही प्रतिमा साकारली आहे.
advertisement
जिथे तुकाराम महाराजांनी थांबा घेतला, पुण्यातील त्या मंदिरात अशी साजरी होते आषाढी, VIDEO
आषाढी एकादशी म्हटली, की संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पंढरीरायाकडे लागतात. या उत्सवात वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग गात आसमंत दुमदुमून सोडतात. विठुरायाच्या दर्शनासाठी खेड्यापाड्यांतून भाविक पंढरपुरात जमा होतात. मागील वर्षी विपुल मिरजकर यांनी विटेवर विठुरायाची प्रतिमा साकारली होती.
यावर्षी 3000 मीटर दोरा व 300 खिळ्यांचा वापर करून विपुलने विठुरायाची अप्रतिम कलाकृती साकारली आहे, असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार विपुल मिरजकर यांनी सोलापूरात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्टची कमाल -
आषाढी एकादशीनिमित्त बरेच जण पंढरपूरच्या वारीसाठी जात असतात. मात्र, कित्येक जणांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशावेळी बरेचसे कलाकार आपल्या कलेतून विठ्ठलाप्रती असणारी आपली भक्ती व्यक्त करतात. कोल्हापुरातील एका मायक्रो आर्टिस्टनेही अशाच प्रकारे मायक्रो आर्टच्या माध्यमातून आपली विठ्ठल भक्ती व्यक्त केली आहे.
पेशाने कलाशिक्षक असले तरी आपली कला वेगवेगळ्या पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम कोल्हापुरातील संतोष कांबळे हे करत आले आहेत. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावचे संतोष कांबळे हे पेठ वडगाव येथील बळवंतराव हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.





