जिथे तुकाराम महाराजांनी थांबा घेतला, पुण्यातील त्या मंदिरात अशी साजरी होते आषाढी, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी याठिकाणी विठ्ठल रुख्मिणी मंदिर आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी थांबा घेतलेले मंदिर म्हणून या देवस्थानाचे महत्त्व वेगळे आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : पंढरीच्या वारीला जाताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी थांबा घेतलेले मंदिर हे पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी याठिकाणी आहे. या देवस्थानाचे एक वेगळे महत्व आहे. गेल्या 400 वर्षाहून अधिक काळापासून या मंदिरात आषाढीचा उत्सव साजरा होत आहे. नेमकी काय आहे ही परंपरा, हेच आपण आज जाणून घेऊयात.
पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी याठिकाणी विठ्ठल रुख्मिणी मंदिर आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी थांबा घेतलेले मंदिर म्हणून या देवस्थानाचे महत्त्व वेगळे आहे. आकुर्डीतील विठ्ठल मंदिर साधारण 400 ते 500 वर्षांपूर्वीचे असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. देहूतून निघून वारीसाठी मार्गस्थ होताना आकुर्डी परिसरातील या विठ्ठल मंदिरात त्यांनी विसावा घेतला, ही आख्यायिका या स्थानाशी जोडलेली आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त गोपाळ नाना कुटे यांनी दिली.
advertisement
या तारखेपासून सुरू होतोय चातुर्मास, या काळात नेमकं काय करावं, कोणत्या गोष्टी करू नयेत, संपूर्ण माहिती
आषाढी एकादशीच्या निमित्ताने परिसरातील भाविक या ठिकाणी दर्शनास येतात. ज्या भाविकांना पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेता येत नाही, असे भाविक याठिकाणी दर्शनाला येतात. या मंदिराच्या गाभाऱ्यात विठोबा-रखुमाईची पाषाणमूर्ती आहे. या मंदिरात भजनी मंडळाच्या वतीने भजन, कीर्तन दररोज केले जाते. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पूर्वी काही स्थानिकांना वतनात जागा मिळाल्या. त्याचप्रकारे साधारण 14 व्या शतकात शहरातील स्थानिक कुटे परिवाराला हे मंदिर वतनात मिळाले. तेव्हापासून त्यांच्या 9 पिढ्या या मंदिराची देखभाल करत आहेत.
advertisement
या मंदिरातील दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत. वारीदरम्यान या मंदिरात हजारो वारकरी येतात. संत तुकाराम महाराजांनी ही पायी वारीची परंपरा या मंदिरात सुरू केली. तेव्हापासून ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे. कुटे कुटुंबासह आकुर्डीतली अनेक कुटुंबे वारीच्या काळात वारकऱ्यांची आपलेपणाने सेवा करतात. तसेच याठिकाणी विविध कार्यक्रमही राबवले जातात.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 17, 2024 3:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
जिथे तुकाराम महाराजांनी थांबा घेतला, पुण्यातील त्या मंदिरात अशी साजरी होते आषाढी, VIDEO