राजन पाटील यांची बादशाहत संपुष्टात
माजी आमदार राजन पाटील यांनी बिनविरोध झालेल्या प्राजक्ता पाटील यांचं नगराध्यक्ष पदाचं प्रमाणपत्र घेतलं. पण दुसरीकडे मोहोळमध्ये पाटलांना मोठा धक्का बसला. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या राजन पाटील यांची बादशाहत संपुष्टात आली. पाटलांच्या किल्ल्याला भगदाड पाडलं ते 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या पोरीनं...
advertisement
मोहोळमध्ये अनगरच्या प्रकरणामुळे दुर्लक्ष?
2009 साली मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला. मात्र त्यानंतरही पाटलांनी या मतदारसंघावरची आपली पकड कायम ठेवली. 2009 साली लक्ष्मण ढोबळे, 2014 साली रमेश कदम आणि 2019 मध्ये यशवंत माने हे राजन पाटील समर्थक आमदार निवडून आले. परंतू यंदा मोहोळमध्ये पाटलांना अनगरच्या प्रकरणामुळे दुर्लक्ष झालं की काय? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. मोहोळ अन् अनगरमधील राजन पाटील यांचं वर्चवस्वाला धक्का कसा बसला? असाही प्रश्न विचारला जाऊ लागलाय.
मोहोळमध्ये पाटलांचं नामोहरण
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यानंतर आता काही आठवड्यांपूर्वीच राजन पाटील यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये गेल्यानंतर नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचं आव्हान राजन पाटील यांच्यासमोर होतं. मात्र, अनगरमध्ये प्रचंड वादविवादानंतर निकाल लागला तर मोहोळमध्ये तर पाटलांचं नामोहरण झाल्याचं दिसून आलं.
कोण आहे सिद्धी वस्त्रे?
मोहोळमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती केली होती. सिद्धी वस्त्रेसह मोहोळमधील उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती. सिद्धी वस्त्रे यांच्यावर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली होती. तब्बल 30 वर्षानंतर वस्त्रे परिवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. या पूर्वीचा विश्वास कायम ठेवत पुन्हा परिवाराला मतदारांनी संधी दिली होती. शहरातील रस्ते, रुग्णालय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं सिद्धी वस्त्रेने सांगितलं.
