सोलापूर शहरातील कुंभार वेस येथे असलेल्या बडे मौलाली दर्ग्याला हिंदू आणि मुस्लिम भाविक आपल्या मुलांना वाघासारखं रंगवून, गळ्यात हार आणि दोन्ही हातांना मोरांचे पंख बाधून दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी घेऊन जातात. मोहरममध्ये नवसाचे वाघ सजवून नवस फेडण्याची परंपरा गेल्या 300 वर्षाची आहे, अशी माहिती मुजावर मोहम्मद भाई यांनी दिली.
चल ग सखे पंढरीला…! आषाढी वारीनिमित्त तरुणांनी गायलं भक्तीगीत, तुम्हालाही आवडेल हा Video
advertisement
अशी आहे अख्यायिका
“ज्या दांपत्याला मुलगा होत नाही, ते मुलगा व्हावा म्हणून बडे मौलाली दर्ग्याला येऊन नवस मागतात. जेव्हा नवस पूर्ण होतो, तेव्हा त्या मुलाला वाघाच्या वेशभूषेत बडे पीर मौलाली दर्ग्यामध्ये दर्शनासाठी घेऊन जातात. नवसाच्या मुलाच्या हस्ते दर्ग्यात नैवेद्य दाखवून दर्ग्यासमोर असणाऱ्या हवाला (जमिनीत खड्डा करून त्या मध्ये लावलेली आग) समोर पाचवेळा फेऱ्या मारून बडे पीर मौलाली यांचे आभार मानले जाते.
बडे पीर मौलाली दर्ग्यामध्ये कोणताही स्त्री - पुरुष किंवा जात - पात असा भेदभाव न करता दर्शन घेण्यासाठी दर्ग्यामध्ये प्रवेश दिला जातो. मोहरममध्ये सोलापुरात नवसाचे वाघ सजवणारे रंगारी, फुल विक्रेता, कपडे विक्रेते तसेच प्रसाद विकणाऱ्या व्यवसायिकांसह लहान - मोठ्या वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना रोजगार मिळतो.