नुरोद्दीन उस्मान मुल्ला राहणार नई जिंदगी हे गेल्या 20 वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. गरिबांच्या घरांमध्ये शिक्षण झाले पाहिजे, वयोवृद्ध महिलांना शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम देखील नुरोद्दीन मुल्ला करत आहेत. नुरोद्दीन मुल्ला एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते.
Free Haircut: जालन्यातील नाभिक समाजानं ठरवलं, रस्त्यावर थाटलं दुकान, मोफत करतायत दाढी-कटिंग, Video
advertisement
प्राध्यापकाची नोकरी सोडून त्यांनी समाजसेवा सुरू केली. कोणताही जात-पात न पाहता एखाद्या गरीब गरजू कुटुंबातील सदस्याची मयत झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य किंवा आर्थिक मदत देण्याचं काम नुरोद्दीन मुल्ला करत आहेत. ज्या घरामध्ये विधवा महिला आहे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे अशा मुलीचं लग्न असेल तर लग्नाला लागणारे साहित्य, जेवणाचा खर्च, आणि आर्थिक मदत करत आहेत.
2004 पासून नुरोद्दीन मुल्ला रफाई वेल्फेअर सोसायटी संस्था चालवत आहेत. प्राध्यापकाची नोकरी सोडून सामाजिक काम करत असताना नुरोद्दीन मुल्ला यांना समाजातील गरजू लोकांना मदत केल्यावर जी मनाला शांती मिळते त्याचा आनंदच वेगळा आहे. समाजातील दानशूर लोकांनी देखील गरजू गरीब लोकांना मदत करावी आणि आपल्या मनाला जे समाधान मिळते त्याचा आनंद घ्यावा, असे मत सामाजिक कार्यकर्ते नुरोद्दीन मुल्ला यांनी व्यक्त केले आहे.