पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्नच नाही! सोलापूर महामार्गाचा प्लॅन बदलला, इथं होणार 6 पदरी उड्डाणपूल
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Solapur Highway: पुण्यातील सोलापूर महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. आता राज्य सरकारने नव्या महामार्गाचा प्लॅन बदलला आहे.
पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हडपसर ते यवत या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यास मंजुरी दिली. त्यानुसार भैरोबा नाला ते यवतपर्यंत सहापदरी उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाची लांबी सुमारे साडेचार किलोमीटरने वाढणार असून महामार्गावरील वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे शहरातून सोलापूरकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 65 वरून जावे लागते. हडपसर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यामुळे येथे वाहतूक वाढली आहे. सोलापूरहून शहरात येणारी किंवा पुण्यातून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी हडपसरऐवजी आता भैरोबा नाला येथून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची एकूण लांबी सुमारे साडेचार किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर करण्यात येणार असून कामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे असेल.
advertisement
प्रकल्पातील महत्त्वाचे बदल
view commentsभैरोबा नाला ते यवत या नव्या मार्गामुळे उड्डाणपूल मार्गाची लांबी आता अंदाजे 39 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. आधीचा हडपसर–यवत हा सुमारे 34.5 किलोमीटरचा प्रस्ताव होता, त्यामुळे जवळपास साडेचार किलोमीटरचा अतिरिक्त विस्तार होत आहे. लांबी वाढल्यामुळे आधी मंजूर केलेल्या 5,262 कोटी रुपयांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यताही आहे. हा प्रकल्प बीओटी पद्धतीने उभारला जाणार असल्याने काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली सुरू होईल. निविदा प्रक्रिया झाल्यावर तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 12:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्नच नाही! सोलापूर महामार्गाचा प्लॅन बदलला, इथं होणार 6 पदरी उड्डाणपूल









