पुजाला काय हवं होतं?
गोविंद यांनी गेवराईत मोठा बंगला बांधला होता. तिथं त्याचं कुटूंब राहत होतं. गोविंदचा मित्र चंद्रकांत शिंदे याने आणि गोविंदने तिला एक दिवस बंगला दाखवला आणि ती दोन दिवस बंगल्यात देखील राहिली. तिला तो बंगला इतका आवडला की, तिने गोविंदकडे बंगला नावावर करून देण्याचा तगदा लावला. तुला दुसरा बंगला घेऊन देतो, असं प्रॉमिस देखील गोविंदने केलं होतं. परंतू पुजाला हा बंगला खूपच आवडल्याने तिने गोविंदचं काहीही ऐकलं नाही. बंगला तुला दिलाय हे माझ्या बायकोला आणि माझ्या वडिलांना कळला तर भावकीत माझी अब्रु जाईल, असं गोविंद पुजाला म्हणाला होता. मात्र, पुजाने काहीही ऐकलं नाही.
advertisement
फिर्यादीत पुजावर आरोप काय?
पुजा देविदास गायकवाडने गोविंदचे सोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेवून, प्रेमसंबध ठेवले अन् वेळोवेळो पैसे, सोने नाणे व मावशीचे व नातेवाईकाचे नावावर प्लॉट, जमीन यापूर्वी घेवून दिली होती. पुन्हा आणखीन भावाच्या नावावर 5 एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर नाहीतर तुला बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन आणि पैसे देण्याकरीता वारंवार तगादा लावला होता. भावजी गोविंद यांना स्वतः पिस्टलने डोक्यात कानाजवळ गोळी घालून घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादी लक्ष्मण चव्हाण यांनी म्हटलं आहे.
घटनास्थळी काय काय दिसलं?
पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले, गाडी आतून लॉक होती. पोलिसांनी गोविंदच्या नातेवाईकांशी संपर्क साधून दुसरी चावी मागवून घेतली अन् गाडीचे लॉक काढलं. गाडीत परदेशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक पुंगळी आढळली, त्याच बंदुकीतून गोळी सुटल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी नातेवाइकांच्या उपस्थितीत मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविला. गोविंद बर्गे याने ज्या बंदुकीतून गोळी झाडून घेतली, त्यात एकच गोळी होती. त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. त्याच्याकडे परवान्याची कोणतीही बंदूक नव्हती, असं नातेवाइकांनी पोलिसांना सांगितलंय.