बारापैकी अवघ्या चार नगरपरिषदेवर फुललं कमळ
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील अनेक मातब्बर पक्षात घेऊन नगरपरिषद निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर 12 नगराध्यक्ष उभे केले होते. त्यातील मैंदर्गी, अक्कलकोट आणि बार्शी नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायतवर भाजपाचे कमळ चिन्ह निवडून आले आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने अंतर्गत समन्वय नसल्यामुळे बार्शी आणि मोहोळ नगरपरिषदेवर सुपडा साफ झाला. कुर्डूवाडी येथील स्थानिक शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी योग्य प्रचार करत उद्धव सेनेला एका नगरपरिषदेवर विजय मिळवून दिला. मोहोळ नगरपरिषदेवर रमेश बारस्कर आणि उमेश पाटील यांची जोडी पुन्हा एकदा राजन पाटील यांना विरोध करून नगरपरिषदेवर सत्ता आणण्यात मदत केली आहे.
advertisement
बागल गटाचा मोठा धुव्वा
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या राजकीय कौशल्य वापरून अक्कलकोट तालुक्यातील तीन पैकी दोन नगरपरिषदेवर कमळ फुलवलेला आहे. सचिन कल्याणशेट्टी यांनी आपला गड शाबूत ठेवत बंधू मिलन कल्याणशेट्टी यांना मोठ्या फरकाने निवडून आणलं. दुधनी नगर परिषदेवर शिवसेना शिंदे पक्षाकडून सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या होम मैदानावर जोरदार फिल्डिंग लावली होती त्यातून दूधनी नगर परिषदेवर भगवा फडकवला आहे. दुसरीकडे बार्शी नगर परिषदेवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले. राजेंद्र राऊत यांनी शांत आणि संयमी नियोजन करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.. राजेंद्र राऊत यांचा बार्शी शहर विकासाचा मुद्दा मतदारांना भावला आहे. करमाळा नगर परिषदेवर स्थानिक आघाडीचे नेत्यांनी आपलं वर्चस्व प्राप्त केला आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह बागल गटाचा मोठा धुव्वा उडाला.
मोहिते पाटलांनी गड राखला, भाजपचा सपाटून पराभव
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज नगरपरिषद प्रतिष्ठेची केली होती. माजी आमदार राम सातपुते हे भाजपला मोठी धोबीपछाड देतील असं वाटत असतानाच मोहिते पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जिल्ह्यात मोठी कसरत करावी लागली आणि पराभवाला सामोरे जावे लागले. सांगोला नगर परिषदेवर शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजी पाटील यांची एकाहाती सत्ता पाहायला मिळाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकाप आणि भाजप युती करून नवीन फार्मूला तयार केला होता मात्र मतदारांनी शहाजी पाटील यांना साथ देत युतीचा फॉर्मुला नाकारला आहे.. मंगळवेढा नगरपरिषदेवर स्थानिक गटाचा बोलबाला पाहायला मिळाला भाजप आमदार समाधान आवताडे यांना मोठा धक्का बसत त्यांच्या काकी मोठ्या फरकाने निवडून आल्या.
पंढरपूरचे आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेवर एखादी पकड होती त्याची परिस्थिती पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकीवरीन आली. पंढरपूर नगरपरिषदेवर भालके कुटुंबीयांचे एका हाती वर्चस्व पाहायला मिळालं. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पॅनल अपयशी ठरल. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भालके गटाचा बोलबाला पाहायला. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पालकमंत्री गोरे यांनी राजकीय प्रयोग यशस्वी होऊ शकली नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे हे काठावर पास झाले आहेत.
