Success Story : नोकरी करत सुरू केला कुक्कुटपालन व्यवसाय, विशालची महिन्याला 3 लाख उलाढाल, कसं मिळवलं यश?
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नोकरी करत कोंबड्यांची काळजी आणि नियोजन करून महिन्याला 2 ते 3 लाख रुपयांची उलाढाल विशाल सूर्यवंशी करत आहे.
सोलापूर : सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून एका नामांकित बिस्किट कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. विशाल पांडुरंग सूर्यवंशी राहणार अनवली असे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे नाव आहे. नोकरी करत कोंबड्यांची काळजी आणि नियोजन करून महिन्याला 2 ते 3 लाख रुपयांची उलाढाल विशाल सूर्यवंशी करत आहे.
नोकरी करत न खचता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील अनवली गावात राहणाऱ्या विशाल सूर्यवंशी यांनी कुक्कुटपालन व्यवसायातून स्वतःचे स्वतंत्र विश्व उभारले आहे. नोकरी करत विशाल यांनी नोकरी करत करत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीच्या आधारावरून ऑस्ट्रालॉर्प कोंबडी पालन करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
ही कोंबडी दिसायला कडकनाथ सारखी काळ्या रंगाची असून चिकन आणि अंड्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या विशाल यांच्याकडे 200 हून अधिक मादी कोंबड्या असून त्यांच्यापासून 140 ते 160 अंडी मिळत आहेत. या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत जवळपास 16 ते 18 रुपयेपर्यंत आहे. तसेच ऑस्ट्रालॉर्प कोंबड्या दोन ते तीन महिन्यात सव्वा किलो पर्यंत होतात. तर या कोंबड्यांचे मांस 190 ते 200 रुपये किलो या दराने विक्री होते.
advertisement
ऑस्ट्रालॉर्प कोंबडी साडेचार ते पाच महिन्यांची झाल्यावर अंडी देण्यास सुरुवात करते. तर 365 दिवसांमध्ये 320 दिवस अंडी मिळतात. तर चार ते पाच महिन्यांमध्ये कोंबडीचे वजन पाच ते सहा किलो पर्यंत होते. कमी भांडवल कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी कोंबडी म्हणजे ऑस्ट्रालॉर्प कोंबडी होय. तर या कोंबडी पासून मिळणाऱ्या अंड्यातून विशाल हे महिन्याला दोन ते तीन लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. नोकरी करत असताना किंवा नोकरी मिळत नसल्याने तरुणांनी ऑस्ट्रालॉर्प या कोंबडीचे कुक्कुटपालन केल्यास नक्कीच फायदा होईल, असा सल्ला विशाल सूर्यवंशी यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 10:30 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : नोकरी करत सुरू केला कुक्कुटपालन व्यवसाय, विशालची महिन्याला 3 लाख उलाढाल, कसं मिळवलं यश?









