मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पावसाने धुमशान घातले. त्यामुळे सीना कोळेगाव धरणातून 1 लाख 45 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. सीना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सोलापूर विजयपूर महामार्ग संपूर्ण पाण्याखाली गेला होता. आज सकाळी पाण्याची पातळी कमी झाल्याने तब्बल 3 दिवसानंतर सोलापूर - विजयपूर महामार्ग सुरू झाला असून एकेरी मार्गाने सध्या वाहतूक सुरू आहे. 3 दिवस हा महामार्ग बंद असल्याने महामार्ग सुरू होताच वाहनांच्या लांब लांब रांगा दिसत आहे.
advertisement
Solapur Tuljapur Road: सोलापूर – तुळजापूर महामार्ग 4 दिवस बंद, का आणि कधी? पाहा पर्यायी मार्ग
दरम्यान, सीना कोळेगव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने सीना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बॅरॅकेट्स लावून सोमवार 29 सप्टेंबर रोजी हा महामार्ग बंद केला होता. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर - विजयपूर महामार्गावरील दोन्ही बाजूला आलेले पाणी कमी झाले. त्यामुळे महामार्ग 3 दिवसानंतर सुरू करण्यात आला असून वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. वाहतुकीची गर्दी झाल्याने वाहनधारकांनी आपली वाहने सावकाश चालवावे, असे आवाहन केले आहे.