मिळालेल्या माहितीनुसार, विलास शिंदे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी होते. ते दौंड येथील एसआरपीएफ बल गट क्रमांक 7 मध्ये कार्यरत होते. सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे त्यांच्या सासरच्या घरी वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नी पूनम शाम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
युद्धाचा मोठा फटका, ऐन हंगामात टरबूजाचे दर 22 वरून 8 वर, शेतकऱ्याचा खर्च निघणे अवघड
गुरुवारी 12 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विलास शिंदे यांनी मुळेगाव येथील सासरच्या घरात कोणाच्याही लक्षात न येता गळफास घेतल्याचे समोर आले. काही वेळाने ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शिंदे यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच विलास यांना मृत घोषित केले आहे.
विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी पूनम काळे, पाच वर्षांची मुलगी आणि अवघ्या तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कर्तव्यदक्ष जवानाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास सोलापूर तालुका पोलीस करत आहेत.






