मोहोळ तालुक्यातील कोळेगावात राहणारे उषा बनसोडे हे गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहत आहेत. पण सीना नदीला कधीही इतके पाणी बघितले नव्हते. नदीला महापूर आल्याने उषा बनसोडे यांनी बांधलेले पत्र्याचे शेड, घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, टीव्ही, कूलर, दोन गाई, शेळ्या, कोंबड्या आणि जनावरांचा वैरण पाण्यात वाहून गेला आहे. जनावरांना वेळेवर वैरण मिळत नसल्याने चार दिवसांपासून बनसोडे यांचा मुलगा वैरणासाठी भटकंती करत आहे. अचानक नदीला पाणी वाढल्याने घरातील कोणतेही साहित्य उषा बनसोडे यांना काढता आले नाही. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान उषा बनसोडे यांचे झाले आहे.
advertisement
Weather Alert : तुफान आलंया! महाराष्ट्रात शुक्रवारी पुन्हा वादळी पाऊस, 21 जिल्ह्यांना अलर्ट
पतीचे निधन झाल्यानंतर उषा बनसोडे यांनी स्वतः दुसऱ्याच्या शेतात राहून दोन गाई, शेळ्या विकत घेतल्या होत्या. पोटच्या लेकरासारखे सांभाळलेली जनावरे डोळ्यादेखत वाहून गेली. सीना नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या गावांना तसेच शेतीला मोठा फटका बसला आहे. तर कित्येक नागरिकांना स्थलांतर करण्यात आलेले आहे. आम्हाला जरी जेवायला मिळाले नाही तरी चालेल पण प्रशासनाने जनावरांना वैरणाची सोय लवकरात लवकर करावी, अशी मागणी उषा बनसोडे यांनी केली.