आमदार रवी राणा वारकऱ्यांच्या पेहरावात दिसून आले. तर नवणीत राणा यांनी वारीतील महिलांसोबत फुगडी खेळली, काही महिलांसोबत फुगडी खेळल्यानंतर त्यांनी पती रवी राणा यांच्यासोबतही फुगडी खेळली. ज्ञानोबा माऊलीचा गजर आणि फुगड्यांचा खेळ रंगल्यानं उपस्थित वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यानंतर श्री विठ्ठल मंदिर सभामंडप येथे नवनीत राणा यांनी पोलीस कर्मचारी महिलेशीही फुगडी खेळली.
advertisement
दरम्यान, आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याचा कालावधी दिनांक 06 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 आहे. या यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. दर्शन रांगेत घुसखोरीमुळे अनुचित प्रकार घडून चेंगराचेंगरी अथवा अन्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दर्शनरांगेत घुसखोरीस प्रतिबंधासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी आदेश पारीत केले आहेत.
