कुणाकडून अधिकचे भाडे घेतले जाणार?
१४ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून वा तदनंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकीट आकारणी करावयाची आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, अशा प्रवाशांकडून त्या आरक्षण तिकिटाचा जुना तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक वाहकाने वसूल करावयाचा आहे. थोडक्यात दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५ च्या ००.०० तासा पासून प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांकडून सुधारित भाडेदराने भाडे आकारणी करावयाची आहेत, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
advertisement
कुणाकडून अधिकचे भाडे घेणार नाही?
ज्या प्रवाशांचा दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवास सुरू होऊन तो दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ ला किंवा त्यानंतर संपत आहे अशा प्रवाशांकडून जुने आणि सुधारित प्रवास भाडे फरकाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये.
दिवाळी गर्दीचा हंगाम संपल्यानंतर मूळ दराने भाडे
दिवाळी गर्दीचा हंगाम संपल्यानंतर म्हणजेच दिनांक ०६.११.२०२५ पासून पुन्हा मूळ प्रति टप्पा दराने म्हणजेच दिनांक २५.०१.२०२५ पासून लागू असलेल्या दराने भाडे आकारणी करण्यात यावी, असेही एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
महामंडळाच्या वाहकासाठीही विशेष सूचना
सध्या सर्व आगारात ईटीआय मशीनद्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, ईटीआय मशीनमध्ये असलेल्या टप्पा आणि दरपत्रकामध्ये मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांचे मार्फत आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात येतील. सर्व ईलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये सुधारीत दराप्रमाणे भाडे दरपत्रक कार्यान्वित झाले आहे याची खात्री करावी. त्याशिवाय मार्गावर ईटीआय मशीन देण्यात येऊ नयेत.
जर एखादा वाहक प्रवासभाडे दरवाढीची अंमलबजावणी होण्यापूर्वीच कामगिरीवर गेलेला असेल, तर त्याने "ईटीआय मशीनमध्ये ऑप्शन मेनू मध्ये जाऊन Fare calc हे ऑप्शन सिलेक्ट करावे. सदर ऑप्शन सिलेक्ट केल्यावर Fare calc done हा मॅसेज मशीनच्या स्क्रिनवर प्रदर्शित होईल. त्यानंतर SYNC EXTRA ROUTE हे ऑप्शन सिलेक्ट करावे. सदर ऑप्शन सिलेक्ट केल्यावर ROUTE SYNC successfully असा मॅसेज स्क्रिनवर प्रदर्शित होईल." अशा सूचना वाहकांना देण्यात याव्यात. जेणेकरुन मशीनमध्ये सुधारीत प्रवासभाडे कार्यान्वित होईल.