हार्बर मार्गावर जम्बोब्लॉक, वाहतूक पूर्णपणे बंद; कोणत्या मार्गावर असणार ब्लॉक?
122 पदांसाठी केली जाणारी ही भरती प्रक्रिया विविध राज्यांमध्ये होणार आहे. प्रत्येक अर्जदार एकावेळी फक्त एकाच राज्यासाठी एकदाच अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून शुल्क करण्याची प्रक्रियाही ऑनलाईनच असणार आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2025 आहे. प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म मॅनेजर, प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म डेप्युटी मॅनेजर आणि क्रेडिट ॲनालिस्ट मॅनेजर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
advertisement
वन विभागामध्ये नोकरीच्या संधी, शेवटची तारीख आली जवळ; असा करा अर्ज
प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म मॅनेजर पदासाठी 34 पदे आहेत, प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म डेप्युटी मॅनेजर पदासाठी 25 पदे तर क्रेडिट ॲनालिस्ट मॅनेजर पदासाठी 63 पदे भरती केली जाणार आहे. अशी एकूण 122 पदांसाठी ही भरती होणार आहे. प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म मॅनेजर पदासाठीची शैक्षणिक पात्रता 60 टक्के गुणांसह B.E./ IT क्षेत्रात B.Tech. पदवी/Computers /Computer Science/ Electronics/ Electrical/ Instrumentation/ Electronics आणि Tele Communication पदवी किंवा MCA पदवीची आवश्यकता आहे. शिवाय, संबंधित क्षेत्रामध्ये किमान 5 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे.
मुंबईकरांनो! ॲाफिसला जाण्याआधी ही बातमी वाचा! कारण इथं मार्ग आहे बंद
प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म डेप्युटी मॅनेजर पदासाठी शैक्षणिक पात्रता 60 टक्के गुणांसह B.E./ IT क्षेत्रात B.Tech. पदवी/Computers /Computer Science/ Electronics/ Electrical/ Instrumentation/ Electronics आणि Tele Communication पदवी किंवा MCA पदवीची आवश्यकता आहे. शिवाय, संबंधित क्षेत्रामध्ये किमान 3 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे. तर, क्रेडिट ॲनालिस्ट मॅनेजर पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीची आवश्यकता आहे. MBA (Finance)/ PGDBA / PGDBM / MMS (Finance)/ CA / CFA / ICWA या पदव्यांची आवश्यकता आहे. तर संबंधित क्षेत्रामध्ये किमान 3 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे.
पाली भाषेला स्वतंत्र विभाग द्यावा ; मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी 23 दिवसांपासून सुरू आंदोलन
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 25 असून जास्तीत 35 वर्षे इतकी आहे. तिनही पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. शिवाय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी वयामध्ये 5 वर्षांची सूट आहे. तर इतर मागासवर्गासाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.