Mumbai Local Mega Block : हार्बर मार्गावर साडे चौदा तासांचा जम्बो ब्लॉक, वाहतूक पूर्णपणे बंद; कोणत्या रेल्वे मार्गावर कधी असणार ब्लॉक?

Last Updated:

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी शनिवार- रविवारी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. कायमच वर्दळीचे स्टेशन म्हणून समजल्या जाणाऱ्या कुर्ला स्टेशनवर देखील मेगाब्लॉकच्या काळात अनेक काम केले जाणार आहे.

Mumbai Local: मुंबईकर 4 दिवस खोळंबा होणार, ब्लॉकमुळे अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक
Mumbai Local: मुंबईकर 4 दिवस खोळंबा होणार, ब्लॉकमुळे अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक
मध्य रेल्वेने (Central Railway) सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी शनिवार- रविवारी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. कायमच वर्दळीचे स्टेशन म्हणून समजल्या जाणाऱ्या कुर्ला स्टेशनवर देखील मेगाब्लॉकच्या काळात अनेक काम केले जाणार आहे. कुर्ला स्टेशनवर एलिव्हेटेड हार्बर लाइन स्टेशन बांधण्यासाठी ट्रॅक डायव्हर्जनचे काम करणार आहे. हे काम ऐतिहासिक मानले जात असून अशा प्रकारचे काम बऱ्याच काळानंतर करण्यात येत आहे.
या काळामध्ये तब्बल साडे चौदा तासांचा (14 तास 30 मिनिटे) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी रात्री 11:05 ते रविवारी दुपारी 01:05 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. साडे चौदा तासांच्या मेगाब्लॉकच्या काळामध्ये, वडाळा रोड- मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील. या काळामध्ये हार्बर रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगाब्लॉकच्या काळामध्ये, हार्बर रेल्वेवरील कुर्ला स्थानक आणि टिळक नगर स्थानकादरम्यान प्रस्तावित रेल्वे डायव्हर्जनसाठी हार्बर लाईनचे ट्रॅक पुन्हा समरेखित (Will Align) केले जाणार आहे.
advertisement
दरम्यान, शनिवारी रात्री 10: 20 ते रविवारी दुपारी 02:19 पर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. तर, शनिवारी रात्री 10:07 वाजेपासून रविवारी दुपारी 12:56 वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणारी सेवा रद्द असेल.डाऊन हार्बर मार्गावरून सीएमटीवरून वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल शनिवारी रात्री 10:14 वाजता सुटेल. डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीवरून रविवारी दुपारी 01:30 वाजता सुटेल. ब्लॉकदरम्यान पनवेल- मानखुर्द- पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.
advertisement
दरम्यान, मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 09:00 ते दुपारी 01:00 या कालावधीत घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) या स्थानकावर जाणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या सुमारे 18 एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर, पश्चिम रेल्वेवरील मेमू ट्रेन 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावतील. तसेच सकाळी 09:50 ची वसई रोड- दिवा मेमू गाडी कोपर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Mega Block : हार्बर मार्गावर साडे चौदा तासांचा जम्बो ब्लॉक, वाहतूक पूर्णपणे बंद; कोणत्या रेल्वे मार्गावर कधी असणार ब्लॉक?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement