याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी सुमारे 250 कोटी रुपयांचा खर्च करून हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. यासाठी 6 वर्षांचा कालावधीही लागला. तरी देखील कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कल्याण शीळ रोडवरील या पुलाची एक लेन जुलै महिन्यात सुरू केली होती. त्यानंतर काहीच दिवसात पुलावर तोच दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याने हा पूल लगेच बंद केला गेला होता. रस्त्याचं काम पूर्ण करून दोन दिवसांनी पुन्हा तो वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र, पुन्हा त्यावर खड्डे पडले आहेत.
advertisement
Navratri 2025: महालक्ष्मी पावली! नवरात्रीत या मार्गांवर धावणार बेस्टच्या विशेष बस
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 18 सप्टेंबर रोजी एका शासकीय कार्यक्रमासाठी आले असता त्यांना देखील खड्यांतून धक्के खात प्रवास केला. डोंबिवली, कल्याणमध्ये नवरात्रौत्सवाची धामधूम असताना राज्यभरातील मान्यवरांना शहरात येतांना अडथळे येऊ नयेत यासाठी पुलाची दुरुस्ती दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत. आता दोन दिवसांपासून पुलावरील डांबरी जाड थर काढून त्यावर अस्फाल्ट टाकण्याचं काम नव्याने सुरू याकामासाठी पुलावरील एक लेन पूर्णपणे बंद केली आहे.