हिंगोली: हिंगोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगोलीच्या वेलतुरा गावामध्ये दोन गटांमध्ये राडा झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. एवढंच नाहीतर लाठ्या काठ्याने मारहाणही करण्यात आली. घटनेचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गावात पोलीस पोहोचले असून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा या गावामध्ये ३० सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. गावात डिजेच्या दणक्यात काही तरुण नाचत होते. पण अचानक दोन गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या गटांमध्ये तुफान मारामारी सुरू झाली. दोन्ही बाजूने एकमेकांवर तुफान दगडफेक झाली.
advertisement
.या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा राडा का झाला हे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीनंतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले आहेत. गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)