साई संस्थानच्या प्रसादालयाच्या अन्नदानात जे पैसे जातात ते आमच्या मुलांच्या मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा अशी मागणी सुजय विखे यांनी केली. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले, मात्र तेथे चांगले शिक्षक नाहीत, इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही, इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय, याचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही आंदोलन देखील करू, असा इशारा त्यांनी दिला.
advertisement
भारताची पुढची मॅच कोणाविरुद्ध? 17 दिवसानंतर टीम इंडिया खेळणार टी-२० मालिका
सुजय विखे यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता दिसताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला केल्याचे सांगत भिक्षेकऱ्यांच्या अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. शिर्डीत मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता, यासाठी स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील. हे मी मान्य करतो. मात्र भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता असेही ते म्हणाले.
हत्या प्रकरणात भाजप-RSSचे ९ कार्यकर्ते दोषी; शाखा उघडण्यावरून झाला होता वाद
भिक्षेकरी आणि साईभक्त यांच्यात अनेकदा वाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे याबाबत काहीतरी नियमावली तयार व्हावी अशा सूचना प्रशासनाला दिल्याचे राधाकृष्ण विखे यांनी यावेळी सांगितले.सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्यावर पडदा टाकताना त्यांनी शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना प्रसाद भोजन मोफत मिळाले पाहिजे, त्यासाठी शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही. साईभक्तांच्या देणगीतूनच महाप्रसाद दिला जातो. तो निरंतर चालू राहील असे सांगत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
OYO ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला रूम मिळणार की नाही ते एकदा वाचाच
सुजय विखे यांच्या मागणीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भोजनावरून विखे पिता पुत्रांची वेगवेगळी भूमिका असल्याचे समोर आले आहे. यावर सुजय विखे पुढे काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
