हत्या प्रकरणात भाजप-RSSचे ९ कार्यकर्ते दोषी; केरळमध्ये संघाची शाखा उघडण्यावरून झाला होता वाद
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
केरळमधील कन्नूर जिल्ह्यात १९ वर्षापूर्वी झालेल्या DYFI कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी कोर्टाने भाजप- संघाच्या ९ कार्यकर्त्यांना दोषी ठरवले आहे.
कन्नूर: केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या जिल्ह्यातील थलशेरी येथे 19 वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 कार्यकर्त्यांना दोषी ठरवले. 10 ऑक्टोबर 2005 रोजी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI)चा कार्यकर्ता रिजितची हत्या झाली होती. या प्रकरणी 19 वर्षानंतर कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. सर्व दोषींना 7 जानेवारी रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
कशामुळे झाली होती हत्या
RSSची शाखा उघडण्यावरून झालेल्या राजकीय वादातून रिजित हत्या झाली होती. शाखा उघडण्यावरून सुरू झालेल्या हा वाद राजकीय संघर्षात बदलला. १० ऑक्टोबर २००५ रोजी कन्नूर जिल्ह्यातील थाचानकंडी येथील मंदिराजवळ रिजित आणि त्यांच्या मित्रांवर तलवारी, चाकूने हल्ला झाला होता. जखमी अवस्थेत रिजितचे रुग्णालयात जात निधन झाले होते.
OYO ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला रूम मिळणार की नाही ते एकदा वाचाच
थलशेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने रिजितच्या हत्येप्रकरणी व्ही.व्ही. सुधाकरण (वय-56), के.टी. जयेश (वय-39), सी.पी. रंजीत, पी.पी. अजींद्रन (वय-50), आय.व्ही. अनिल कुमार (वय-51), पी.पी. राजेश (वय-46), व्ही.व्ही. श्रीकांत (वय-46), व्ही.व्ही. श्रीजित (वय-42), आणि टी.व्ही. भास्करन (वय-66) या नऊ जणांना दोषी ठरवले आहे. या खटल्यात आणखी एक दहावा आरोपी होता, मात्र खटला संपण्यापूर्वीच त्याचे निधन झाले.
advertisement
हिमालयातील 32.6 मेट्रिक टन सोन्याचे रहस्य काय? इथे दडलाय ६०० अब्ज रुपयांचा खजिना
आरएसएस-भाजप गटाने राजकीय वादातून रिजित यांची हत्या केली. हे आमचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले. आम्ही पुरावे सादर करून खटला सिद्ध केला, असे विशेष सरकारी वकील बी.पी. ससींद्रन यांनी निकालानंतर सांगितले. या खटल्या दरम्यान सरकारी पक्षाकडून २८ साक्षीदार, ५९ कागदपत्रे आणि अन्य ५० हून अधिक पुरावे सादर करण्यात आले.
advertisement
पाणीपुरीवाल्याला आली ४० लाखांची GST नोटीस; UPIद्वारे पैसे घेतल्याने लागला सुगावा
view commentsकोर्टाच्या निकालानंतर रिजितच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. आम्ही या दिवसाची 19 वर्षे वाट पाहिली, अशी प्रतिक्रिया रिजितची बहिण श्रीजाने दिली. आम्हाला आशा आहे की सर्व दोषांना कठोर शिक्षा मिळेल, असे तिने म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 05, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/देश/
हत्या प्रकरणात भाजप-RSSचे ९ कार्यकर्ते दोषी; केरळमध्ये संघाची शाखा उघडण्यावरून झाला होता वाद


