Team India Next Match: भारताची पुढची मॅच कोणाविरुद्ध? 17 दिवसानंतर टीम इंडिया खेळणार टी-२० मालिका, असे आहे वेळापत्रक
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India vs England: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर आता भारताला घरच्या मैदानावर इंग्लंडचा सामना करायचा आहे. येत्या २२ जानेवारीपासून टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ३-१ असा पराभव झाला. या मालिका पराभवामुळे १० वर्षानंतर प्रथमच ही ट्रॉफी भारताकडून ऑस्ट्रेलियाकडे गेली आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील पराभवावर चाहते निराश आहेत. आता या मालिकेनंतर पुढे भारत कोणत्या संघाविरुद्ध मॅच खेळणार आहे ते जाणून घेऊयात...
भारताची पुढील मॅच अजून १७ दिवसांनी होणार आहे. ही लढत इंग्लंडविरुद्ध टी-२० फॉर्मेटमधील असेल. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्याची सुरुवात २२ जानेवारीपासून होणार आहे. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही.
OYO ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला रूम मिळणार की नाही ते एकदा वाचाच
दोन्ही संघातील टी-२० मालिकेची सुरुवात २२ जानेवारीपासून होईल. दुसरी मॅच २५ जानेवारी, तिसरी २८ जानेवारी, चौथी ३१ जानेवारी तर पाचवी मॅच २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली आहे.
advertisement
टी-२० प्रकारातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी वर्ल्डकप विजयानंतर निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे हे खेळाडू संघात दिसणार नाहीत. टी-२० संघात रिंकू सिंह, अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव सारखे स्फोटक खेळाडू दिसतील. सोबत स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या देखील असेल.
advertisement
भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड
या टी-२० मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती दिली जाते की ते मैदानावर उतरणार याची चाहत्यांना उत्सुकता असेल. या दोन्ही फलंदाजांना ऑस्ट्रेलियात धावा करण्यात अपयश आले होते.
advertisement
टी-२० मालिका (IND vs ENG T20I)
पहिली मॅच- २२ जानेवारी, कोलकाता
दुसरी मॅच- २५ जानेवारी, चेन्नई
तिसरी मॅच- २८ जानेवारी, राजकोट
चौथी मॅच- ३१ जानेवारी, पुणे
पाचवी मॅच- ०२ फेब्रुवारी, मुंबई
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 05, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India Next Match: भारताची पुढची मॅच कोणाविरुद्ध? 17 दिवसानंतर टीम इंडिया खेळणार टी-२० मालिका, असे आहे वेळापत्रक


