TRENDING:

मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की... राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदी विराजमान!

Last Updated:

Sunetra Pawar Take oath: महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची नोंद झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. राज्याच्या इतिहासात पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. अजित पवार यांना स्मरूण त्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी एकद वादा अजितदादा... अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी राजभवनचा सेंट्रल हॉल दुमदुमून गेला.
News18
News18
advertisement

तत्पूर्वी सरकारी बंगला 'देवगिरी'वर सुनेत्रा पवार यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या फोटोला नमस्कार करून राजभवनाकडे कूच केली. शपथ घेण्याआधी त्यांनी अजित पवार यांना नमन करून त्यांचे एकप्रकारे स्मरण केले. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्याआधी त्यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या नव्या कारकीर्दीला सुरुवात केली.

पवार घराण्यातील सत्तासंघर्ष अजितदादांच्या माघारीनंतरही जैसे थे!

advertisement

अजित पवार यांच्या माघारी पक्षाचे नेतृत्व कोण करणार, याचे उत्तर त्यांच्या निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राला मिळाले. राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी वायू वेगाने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करून वहिनींशिवाय दुसरे कुणीही नेतृत्व करणार नाही, याची यथोचित काळजी घेतली. आज दुपारी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली तसेच पक्षातील निर्णयांचे सर्वाधिकार त्यांच्याकडे सोपवले.

advertisement

दुसरीकडे मुंबईत या सगळ्या घडामोडी घडत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षातल्या सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांना अंधारात ठेवल्याचे सांगितले जाते. महत्वाचे म्हणजे आजच्या शपथविधीसंदर्भात आम्हाला काहीही माहीत नाही, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगून सुनेत्रा पवार यांच्याशी आपल्याशी कोणताही संवाद झालेला नसल्याचे सूचित केले. पवार घराण्यातील सत्तासंघर्ष अजितदादांच्या माघारीनंतरही असाच राहील, याची 'संबंधितांनी' योग्य काळजी घेतलेली दिसते.

advertisement

पवार कुटुंबातील कुणीही शपथविधीला नव्हते

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला शरद पवार यांच्या कुटुंबातील कुणीही उपस्थित नव्हते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार यांनी शपथविधीला उपस्थिती लावण्यासंदर्भात कोणतीही अनुकूल प्रतिक्रिया दिलेली नाही. सुप्रिया सुळे अर्थसंकल्पासाठी नवी दिल्लीला रवाना झाल्या. तर रोहित पवार हे दिवंगत पोलीस अधिकारी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी फलटणला गेले.

advertisement

सुनेत्रा पवार यांना लहानपणीच राजकारणाचे बाळकडू, कशी राहिली कारकीर्द

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

सुनेत्रा पवार यांना लहानपणीच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे माहेरचे पाटील कुटुंब हे राजकारणातील त्यावेळसचे महत्त्वाचे कुटुंब होते. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे त्याकाळचे मोठे स्थानिक नेते होते. तेर गाव आणि आसपासच्या बारा वाड्यांचे ते कारभारी पाटील होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र पद्मसिंह पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी दीर्घकाळ शरद पवार यांच्यासोबत काम केले. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे पुत्र राणा जगजीतसिंह पाटील यांनी पुढे चालवला. आता सुनेत्रा पवार देखील उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारून नव्या आव्हानाला तोंड द्यायला सज्ज आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की... राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदी विराजमान!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल