TRENDING:

...तोपर्यंत मंत्रालयात येणार नाही, शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांचं पुढचं पाऊल काय? तातडीने बारामतीला रवाना

Last Updated:

कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून शनिवारी सायंकाळी अगदी साध्या पद्धतीने त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमावर दु:खाचे सावट होते. गांभीर्यपूर्वक दृढकथन करून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. शपथविधीपूर्वी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार
advertisement

कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. राज्याच्या इतिहासात पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. शपथविधीवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजितदादा अमर रहे, एकच वादा अजितदादा, अशा घोषणा दिल्या. त्यांच्या घोषणांनी राजभवनाचा दरबार हॉल दुमदुमून गेला होता.

advertisement

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना, 'तोपर्यंत' मंत्रालयात येणार नाही

शपथविधी कार्यक्रम झाल्याबरोबर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र जय पवार असतील. शपथविधीनंतर सार्वजनिक जीवनात लगोलग सक्रीय न होता किंबहुना शासनाची सूत्रे लगोलग हातात न घेता अजित पवार यांचा दशक्रिया विधी होईपर्यंत बारामतीमध्येच थांबणार असल्याचा निर्णय सुनेत्रा पवार आणि कुटुंबाने घेतला आहे. खातेवाटप जाहीर झाले तरीही दुखवटा संपेपर्यंत मंत्रालयात न येण्याचे त्यांनी ठरवले आहे.

advertisement

तत्पूर्वी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच पक्षाचे सर्वाधिकार देखील त्यांच्याकडे बहाल करण्यात आले.

राष्ट्रवादीची एक बैठक- दोन ठराव

विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची बैठक विधान भवन, मुंबई येथे दि. ३१ जानेवारी, २०२६ रोजी दुपारी दोन वाजता खासदार प्रफुलभाई पटेल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खासदार सुनिल तटकरे, प्रदेशाध्यक्ष, नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत दोन ठराव घेण्यात आले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

१) महाराष्ट्र विधिमंडळ पक्ष नेतेपदी श्रीमती. सुनेत्रा अजितदादा पवार यांची एकमताने निवड करण्यात यावी तसेच २) विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा अजितदादा पवार यांना देण्याबाबतचे दोन ठराव श्री. छगन भुजबळ यांनी मांडले. या दोन्ही ठरावांस हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोड यांनी अनुमोदन दिले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तोपर्यंत मंत्रालयात येणार नाही, शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांचं पुढचं पाऊल काय? तातडीने बारामतीला रवाना
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल