मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल...
अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये रविवारी सायंकाळी मारहाण झाली होती. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. छावा संघटनेकडून राष्ट्रवादी विरोधात आक्रमक आंदोलने सुरू आहेत. तर, दुसरीकडे मारहाणीचे प्रकरण चिघळल्याचे लक्षात येताच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. त्याच वेळी चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांविरोधात लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
advertisement
लातुरात रात्री ड्रामा...
मारहाण प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास सूरज चव्हाण आणि आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती स्वीकारली. सूरज चव्हाणांसह इतर आरोपींना पहाटेच्या सुमारास सोडण्यात पोलिसांनी या सगळ्या कारवाईहबाबत प्रचंड कमालीची गुप्तता बाळगली होती. सोमवारी सूरज चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
नोटीस देऊन सोडलं...
राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरज चव्हाण यांच्यासहित सर्व आरोपींना पोलिसांनी कायदेशीर नोटीस देऊन सोडलं. सात वर्षापेक्षा अधिक शिक्षा नसलेली भारतीय न्याय संहितेची कलमं आरोपी सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारावर असल्यामुळे कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. विवेकानंद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कायदेशीर नोटीस देऊन आरोपी सूरज चव्हाणला सोडून दिले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.