रिक्षाचालकाचे विवाहबाह्य संबंध होते, तसंच याबाबत त्याच्या पत्नीला संशय होता. रिक्षाचालकाच्या पत्नीने त्याला दुसऱ्या महिलेसोबत लॉजवर रंगेहाथ पकडलं. पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत लॉजवर पकडल्यामुळे पतीला स्वत:चीच लाज वाटायला लागली, त्यामुळे त्याने बुधवारी मध्यरात्री ऐरोली खाडीच्या ब्रीजवरून उडी मारली.
पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर रिक्षाचालक पती लॉजवरून निघून गेला आणि त्याने ऐरोली ब्रीजवरून पत्नीला फोन केला आणि चुकीची कबुली दिली आपण खाडीमध्ये उडी मारत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. यानंतर रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी लगेचच याबाबत पोलिसांना माहिती दिली. रबाळे पोलीस आणि ऐरोली अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने खाडी पुलावर दाखल झाले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली.
advertisement
दोन तास रिक्षाचालकाला शोधल्यानंतरही अग्निशमन दल तसंच पोलिसांना यश आलं नाही, अखेर रिक्षाचालक वाहून गेल्याचं समजून शोध मोहीम थांबवण्यात आली. पण गुरूवारी स्थानिकांना खाडी पुलापासून काही अंतरावर एक तरुण गाळात अडकलेला आढळला, त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा बुधवारी पुलावरून उडी मारलेला तरुण हाच असल्याचं स्पष्ट झालं. सुदैवाने हा रिक्षाचालक वाचला असला, तरी या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.