याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी विकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, 'नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड' यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वात शहर विकास विभागाने चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. यावेळी ठाण्यातील वाहतूक सुविधांबाबत माहिती देण्यात आली. ठाणे बुलेट ट्रेन स्टेशन शिवाय, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस स्थानक, जेट्टी (जलमार्ग), कॅब-रिक्षा थांबे, सर्व मोठे महामार्ग आणि विशेष रस्त्याद्वारे नवी मुंबई विमानतळाला कनेक्टिव्हीटी दिली जाणार आहे.
advertisement
Railway Safety: रेल्वेला मिळालं 'कवच'! धडक होण्याचा धोका टळणार, कशी आहे नवीन सिस्टीम?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणे स्टेशन परिसराचा विकास करताना 25 टक्क्याहून अधिक जागेवर हरित क्षेत्र राखलं जाणार आहे. हे स्टेशन भारतातील पहिलं मल्टीमॉडेल एकात्मिक स्टेशन असेल. बुलेट ट्रेन स्टेशन्सच्या परिसराची नियोजनबद्ध आखणी करण्यात येत असल्याची माहिती, नगर विकास व मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे यांनी दिली.
गुंतवणुकीत भर पडणार
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे उद्योजक ठाण्याकडे आकर्षित होतील. त्यातून रोजगार निर्मिती होईल. उद्योजकांना कोणकोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, त्या सर्व सुविधा निर्माण केल्या जातील. नियोजनबद्ध विकासामुळे कोट्यवधींची गुंतवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.