हाय कोर्टाच्या आदेशानुसार, सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच होणार आहे. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करता येणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ठाण्यातील प्रभागनिहाय विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा एकूण 134 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात 23 कृत्रिम तलाव, 77 विसर्जन टाक्या, 15 फिरती विसर्जन केंद्रे, 9 खाडी घाट आणि 10 मूर्ती स्वीकृती केंद्रांचा समावेश आहे.
हरित विसर्जन अॅपचा प्रयोग
ठाणे महानगरपालिकेने 'हरित विसर्जन' नावाने एक मोबाईल ॲप आणि वेबसाईट सुरू केली आहे. या अॅपच्या मदतीने नागरिक आपल्या जवळच्या विसर्जन स्थळांची माहिती मिळवू शकतात आणि तिथे मूर्ती विसर्जनासाठी नावनोंदणी करू शकतात. या सुविधेमुळे विसर्जन प्रक्रियेत अधिक सुसूत्रता येईल. हे ॲप आयफोन आणि अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे.
ठाण्यातील प्रभागनिहाय विसर्जन ठिकाणं
उथळसर प्रभाग
टाकी विसर्जन: रुस्तमजी 1 व 2, परुळेकर मैदान, ऋतुपार्क, परमार्थ निकेतन, सावरकर मैदान
कृत्रिम तलाव: आंबेघोसाळे, रुणवाल नगर
नौपाडा प्रभाग
टाकी विसर्जन: रहेजा संकुल, कशिश पार्क, कोपरी
कृत्रिम तलाव : मासुंदा दत्त घाट
कळवा प्रभाग
टाकी विसर्जन: कळवा 90 फूट रोड
कृत्रिम तलाव : खारीगाव, घोलाई नगर
दिवा प्रभाग
टाकी विसर्जन: बीएसयुपी दिवा
कृत्रिम तलाव: दातिवली
मुंब्रा प्रभाग
टाकी विसर्जन: शंकर मंदिर
कृत्रिम तलाव: शंकर मंदिर घाटाजवळ
माजिवडा प्रभाग
टाकी विसर्जन: स्प्रिंग हिल
कृत्रिम तलाव : रेवाळे
लोकमान्यनगर प्रभाग
टाकी विसर्जन: बस स्टॉप
कृत्रिम तलाव: नोंद नाही
वागळे प्रभाग
टाकी विसर्जन : श्रीनगर
कृत्रिम तलाव: रायलीदेवी तलाव
वर्तकनगर प्रभाग
टाकी विसर्जन: वसंत विहार
कृत्रिम तलाव: उपवन परिसर
