ठाणे महानगपालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी, सर्व मुख्याध्यापक आणि शाळाप्रमुखांना याबाबत एक अधिकृत पत्र जारी केलं आहे. या पत्रानुसार, ठाण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा दोन दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत. आज (18 ऑगस्ट) आणि उद्या (19 ऑगस्ट) सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी असेल.
advertisement
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचं धुमशान, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत तर जनजीवन ठप्प, Video
भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने मुंबईसह ठाण्यात रेड अलर्ट घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच आज दुपार सत्रातील चालू असणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांची राहील, असंही शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय आज शाळा मुख्यालय न सोडण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. 18 आणि 19 ऑगस्ट या दोन दिवशी जर परिक्षा असतील तर त्यांचे पुन्हा नियोजन करण्यास सांगण्यात आलं आहे.
