याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाळीत प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (5 सप्टेंबर) पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीदरम्यान पशुवैद्यकीय विभागाला फिरत्या दवाखान्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर उपस्थित होत्या.
advertisement
Weather Alert: बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजेही येणार, मुसळधार कोसळणार, 11 जिल्ह्यांना अलर्ट
ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे सध्या केंद्रांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे नवीन पशु वैद्यकीय केंद्र उभारणीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. टीएमटीकडील वापरात नसलेल्या बसमध्ये आवश्यक बदल करून सुसज्ज प्राण्यांसाठी फिरते दवाखाने सुरू करण्याचा पर्याय समोर आला आहे. यामध्ये प्रथमोपचार आणि पशुवैद्यक तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असेल. पाळीव प्राण्यांसाठी सुसज्ज रुग्णवाहिकाही तयार केली जाणार आहे. त्यामुळे आता, पाळीव प्राण्यांना त्यांचा घराजवळच उपचार करून घेता येणार आहे.
ठाणे शहरातील विविध भागांत पिसाळलेले भटके श्वान लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अपुरे साहित्य आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेकदा भटक्या कुत्र्यांना आळा बसवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे आयुक्तांनी श्वान नियंत्रण विभागाच्या सक्षमीकरणावरही भर दिला आहे.
प्राण्यांसाठी स्मशानभूमी
ठाणे महापालिकाक्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी तयार करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोपरी, कळवा, मनिषानगर आणि माजिवाडा येथे मृत पाळीव प्राण्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने दहन करण्यासाठी स्मशानभूमी उभारण्याचं काम सुरू आहे. ही स्मशानभूमी महिन्याभरात कार्यान्वित केली जाईल, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.