पैठणमध्ये पावसाचं थैमान, पिके गेली वाहून, घरांत शिरलं पाणी, शेतकरी संकटात, Video
शहवान फरयाझ शेख (वय ३३, रा. दांडेकरवाडी नवीवस्ती, भिवंडी, जि. ठाणे) असे चोरट्याचे नाव आहे. त्याने मैत्रिणीच्या नेरळच्या घरामधील चोरलेली रोख रक्कम गोव्यात मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यात खर्च केल्याचे समोर आले आहे. त्या चोरट्याने पोलिसांना तपासामध्ये ही माहिती दिली आहे. पोलिसांनी आपल्या अथक प्रयत्नाने या मित्र- मैत्रिणीचा शोध घेतला आहे. गणेशोत्सव काळात नेरळच्या राजेंद्र गुरूनगरमधील अंबिका अपार्टमेंटमध्ये २ सप्टेंबरला मोठी चोरी झाली होती.
advertisement
क्रीडापटूंना रेल्वेमध्ये नोकरीची संधी, इतक्या पदांसाठी भरती; अर्जाची प्रोसेस कशी
गणेश संनगरे यांच्या पहिल्या मजल्यावरील घराचे लोखंडी कपाट फोडून ७ तोळे सोने, ६ लाख रुपये रोख असा ऐवज चोरट्याने चोरून नेला होता. त्यामध्ये चोरट्याने दोन गंठण, चैन, ब्रेसलेट, अंगठी आणि रोकड असा मुद्देमाल लंपास केला होता. चोरीसाठी वापरलेला लोखंडी रॉडही घटना स्थळाजवळ सापडला. चोरीची तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी चार शोधपथके तयार करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू होता. घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलिसांनी काटेकोर तपास करून अखेर गोव्यातून त्याला ताब्यात घेतले.