Thane News : प्रदिप भांगे, प्रतिनिधी, ठाणे : आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यातच ठाण्यात नंबर वन पक्ष कोणता? यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये रस्सीखेच सूरू झाला आहे. पक्ष फोडाफोडीचा खेळही सूरू आहे.त्यात आता अंबरनाथचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांना भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप पक्षात घेऊन बॅनरबाजी करून शिवसेनेला डिवचलं आहे. “आता वेळ आली आहे ह्या कार्यसम्राटांना फाटकी शॉल व नासलेले श्रीफळ देऊन घरी बसविण्याची” अशा आशयाचे बॅनर लावत अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला डिवचलं आहे.आता यावर शिवसेनेकडून काय उत्तर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
भाजपच्या बॅनरबाजीत काय?
दिव्यात ४ वर्षापुर्वी ऐन दिवाळीत विकासाच्या नावाखाली सामान्य दिवेकरांच्या इमारती पाडून त्यांना बेघर करत पडले गाव येथे स्थलांतरीत करण्यात आले. मात्र त्यांच्या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे भाजपने "आली दिवाळी पण, आठणीत आहे… दिवेकरांना चार वर्षापुर्वीची काळी दिवाळी” अशा आशयाचे बॅनर लावले आहेत, याचं बॅनरवर विकासाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर विकासकांनी नागरिकांची घरे तोडली. त्यांना बेघर केले आणि ५० रुपयांच्या हप्त्यांसाठी फेरीवाले बसविले,एका संस्थेने तिथे सार्वजनिक शौचालय उभारले.. हाच का तो कार्यसम्राटांचा विकास? असे काम करुन दिव्याचा विकास होणार आहे का? ही घरे फेरीवाले बसविण्यासाठी तोडली होती का? असा प्रश्नही या बँनरमधून विचारण्यात आला असून अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला डिवचलं आहे.
त्यामुळे आता वेळ आली आहे ह्या कार्यसम्राटांना फाटकी शाँल व नासलेले श्रीफळ देवून घरी बसविण्याची”, “मतदान बदला दिवा नक्कीच बदलेल” म्हणजेच या आशयातून स्पष्ट असे दिसून येत आहे की, आता बस्स झाले,ज्यांच्यावर तुम्ही कार्यसम्राट म्हणून विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला बेघर केले आहे. स्थलांतरीत केले आहे, त्यांच्यामुळे तुमच्यावर आज काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आहे. त्यामुळे एकदा मतदान बदलून पहा तरच तुमचे चांगले दिवस येणार आहेत असा संदेश देत दिवेकरांना देण्यात आला आहे.
दिव्यात भाजपने आता निवडणूक तयारी केली असून आपल्या रडावर शिंदेच्या शिवसेना अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला टार्गेट करायचे ठरवल्याची चर्चा आहे.त्यानुसार ऐन दिवाळी 4 वर्षापूर्वी जी गोष्ट घडली होती, त्याची आठवण दिवेकरांना करून देत, त्याचे बॅनर भाजपने लावले आहेत.