दादर : दादर म्हटलं की खवय्यांची मज्जाच असते. दादरमध्ये विविध पदार्थ खाण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. आज अशाच एका ठिकाणाबाबत आपण जाणून घेणार आहोत. दादरमध्ये चैत्यभूमीच्या अगदी बाजूलाच बडापाव जंक्शन या नावाने विराज सिंघ या तरुणाने फूड स्टॉल सुरू केले आहे. त्याच्या या दुकानात वडापाव आणि बर्गर यांचे कॉम्बिनेशन मिळते. यासोबतच बडापाव जंक्शन याठिकाणी चर्चगेट स्लो बडापाव, विरार फास्ट बडापाव या नावांनी पदार्थ मिळतात. या पदार्थांना दादरकरांची मोठी पसंतीही मिळते आहे.
advertisement
सुरुवातीला विकला चहा -
विराजने त्याच्या दुकानाची सुरुवात पहिल्यांदाच चहा विकून केली. चहाचे अगदी 5 ते 6 प्रकार त्याच्या दुकानात मिळतात. यामध्ये ब्लॅक लेमन टी, मसाला अद्रक चाय, गुळाची मसाला चाय, इन्स्टंट कॉफी हे सगळे प्रकार आहेत. विराजच्या या बडापाव जंक्शनमध्ये मुंबई लोकल बडापाव, मुंबई लोकल चिकन बडापाव, विरार स्लो बडापाव, विरार फास्ट बडापाव, चर्चगेट स्लो बडापाव, चर्चगेट फास्ट बडापाव, दादर डबल डेकर बडा पाव हे स्पेशल पदार्थ मिळतात. यांची प्राईज सुद्धा फक्त 45 रुपयांपासून सुरू होते.
विराज सिंगने मास मीडियामधून त्याचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल आहे. कॉलेज झाल्यानंतर तो 4 वर्ष मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रात करिअर करत होता. मात्र, स्वतःला वाटतील, आवडतील असे निर्णय घेण्यासाठी, आपला स्वतःचा असा बिझनेस असावा, या उद्देशाने त्याने हे दुकान सुरू केले. सुरुवातीला हे दुकान सुरू करण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. 4 वर्षे काम करून त्याने या दुकानासाठी पैसे जमा केले आणि मग त्याचं हे स्वप्न सत्यात उतरवलं.
वय 75, पण आज्जी करते चायनीज भेळचा व्यवसाय; नवी मुंबईतील याठिकाणी खवय्यांना मिळतेय उत्कृष्ट चव
आज त्याच्या दुकानात मिळणाऱ्या या वडापावला खवय्यांची पसंती मिळत आहे. तुम्हालाही जर बडापाव जंक्शनमधील वेगळ्या वडापावची चव चाखायची असेल, तर तुम्ही दादरमधील या बडापाव जंक्शनला नक्की भेट देऊ शकतात.





