TRENDING:

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी पालिका विकास आराखड्याविरोधात सर्वच पक्षांनी दंड थोपटले; महिनाभरात हरकतींचा पाऊस

Last Updated:

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी पालिका विकास आराखड्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी ओरड केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भिवंडी, 11 नोव्हेंबर (सुनिल घरात, प्रतिनिधी) : भिवंडी महानगरपालिकेचा विकास आराखडा 6 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर दहा नोव्हेंबरपर्यंत या विकास आराखड्याबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. यादरम्यान, भिवंडी महापालिकेकडे सुमारे अडीच हजारांहून अधिक हरकतींचा पाऊस पडला आहे. भिवंडी पालिका प्रशासनाकडून भिवंडी शहराचा विकास आराखडा लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना समजावून देण्याकरता शुक्रवारी सायंकाळी उशिरा भिवंडी महापालिका सभागृहात एका विशेष सभेच्या आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विरोध केला आहे.
News18
News18
advertisement

या सभेस केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री स्थानिक खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, आयुक्त अजय वैद्य यासोबतच माजी लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मंडळी उपस्थित होती. या बैठकीत अनेकांनी विकास आराखड्याला विरोध केला असून 2003 मध्ये जाहीर केलेल्या विकास आराखडा ची अमलबजावणी अवघी 11 टक्के झाल्याने नव्याने आरक्षण व रस्ता रुंदीकरण होऊ नये अशी भूमिका मांडली.

advertisement

विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर हरकती घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावर अनेकजणांनी हरकती घेतल्या आहेत. लोकप्रतिनिधी व राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या विकास आराखडा चुकीचा बनवला असल्याच्या आक्षेप नोंदवत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. प्रशासन आराखडा बनवताना सर्व माहिती गोळा करून जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करीत 2021 पासून हा आराखडा बनवला तरी त्यामध्ये त्रुटी राहणे चुकीचे आहे. शहराचा विकास झाला पाहिजे, जनहितासाठी आरक्षण असली पाहिजेत, त्यामध्ये कोणाचा काही वेगळा हेतू असेल तर तो वाईट आहे. जिकडे रुंद रस्ता हवा आहे त्याचे आरक्षण त्या ठिकाणी टाकले नाही, मंदिरा शेजारी साल्टर हाऊस आरक्षण टाकले आहे.

advertisement

वाचा - भाजप प्रवेशानंतर तिरुमला ग्रुपचे सुरेश कुटे बीड लोकसभा लढवणार? अर्चना कुटेंनी दिलं उत्तर

या तांत्रिक चुका असून कार्यालयात बसून बनवलेला आराखडा चुकीचा ठरणार आहे. त्यासाठी या विकास आराखड्याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. सर्वच लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकारी यांनी विकास आराखडा रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. परंतु, तो रद्द करता येणार नसल्याने मुदतीत व मुदतीनंतर आलेल्या हरकती विचारात घेऊन सुधारणा कराव्यात. त्यासाठी विश्वासात न घेता बनवलेला विकास आराखडा असल्याने जनआक्रोश चुकीचा नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी पालिका विकास आराखड्याविरोधात सर्वच पक्षांनी दंड थोपटले; महिनाभरात हरकतींचा पाऊस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल