ठाणे : आता श्रावण महिना सुरू होतो यानिमित्ताने अनेक जणी पारंपारिक कपडे परिधान करतात. सुंदर साड्या नेसून पारंपारिक लुक ट्राय करतात. अशा वेळेस महिलांना ज्या आपल्या पारंपारिक साड्यांना, कपड्यांना मॅच होतील अश्या सुंदर पर्स हव्या असतात. तुम्हालाही अशा सुंदर आणि साडीला मॅच होतील, अशा पर्स हव्या असतील तर दादर मधील एक ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.
advertisement
दादर स्थानकापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर असणारे राणेज हे दुकान गेली अनेक वर्ष साड्यांच्या पर्सेसाठी दादरमध्ये प्रसिद्ध आहे. यांच्या इथे फक्त 100 रुपयांपासून साड्यांच्या पर्सेची किंमत सुरू होते. पारंपारिक लुकवर कोणाच्या पर्से वापरायच्या तर दादर मधील राणेज यांच्याच, हा दादरकरांचा फॉर्मुला ठरलेला आहे.
पुण्यात रिक्षाचालकांसाठी राबवली जातेय एक विशेष योजना, प्रवाशांनाही होणार विशेष फायदा!
दादरमधील या दुकानात खणाच्या साडीच्या पर्सेस, वारली चित्र असणाऱ्या पर्सेस, सुंदर नथ मध्यभागी असणाऱ्या पर्सेस, ब्रॉकेट पर्सेस, पैठणी पर्सेस, या सगळ्या प्रकारच्या सुंदर आणि युनिक पर्सेस मिळतात. या दुकानात मिळणाऱ्या नथीच्या पर्सेस इथे खरेदी करायला येणाऱ्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेतात.
सुंदर मोठया नथी आणि साडीचा सुंदर कपडा, असे त्यांचं कॉम्बिनेशन असते. या ठिकाणी मिळणाऱ्या ब्रॉकेट पर्स तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत. नऊवारी साडीवर बहुतांशी महिला सध्या बटवा हातात घेतात. त्या बटव्यांमध्येही इथे खूप वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. इथे मिळणाऱ्या सगळ्या पर्सेची किंमत कमी आहे. त्यांचा कपडा त्याच सोबत शिवणकाम सुद्धा परफेक्ट असल्याने इथे खरेदी करायला येणाऱ्यांना या गोष्टी खूप आवडतात.
'आम्ही गेले 30 वर्ष या व्यवसायात आहोत. महिलांना आवडतील अशा साड्यांच्या पर्सेस आम्ही तयार करतो. मार्केटमध्ये एखादी गोष्ट ट्रेंड असेल तर आम्ही लगेचच आमच्या दुकानात ती आणतो. आमच्या गिऱ्हाईकांचा आमच्या पर्सवर आणि आमच्यावर खूप विश्र्वास आहे,' असे राणेज पर्सेसचे मालक निनाद राणे यांनी सांगितले.
तुम्हालाही पारंपारिक कपड्यांवर हातात मिरवण्यासाठी सुंदर पर्स हवी असेल, तर दादरमधील राणेज पर्सेस हे दुकान तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.